Join us

Maharashtra Rain : सध्या पाऊस कशामुळे पडतो आहे, तो किती तारखेपर्यंत राहणार, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2025 19:39 IST

Maharashtra Rain : आज बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. नेमका हा कशामुळे पडतो आहे, ते पाहुयात..

Maharashtra Rain : आजपासुन पुढील सात दिवस म्हणजे शुक्रवार दि. ३१ ऑक्टोबरपर्यंत मुंबई सह संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्र खान्देश विदर्भात मध्यम पावसाची शक्यता जाणवते. आज बहुतांश ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. नेमका हा कशामुळे पडतो आहे, याबाबत जेष्ठ निवृत्त हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी माहिती दिली आहे. 

कशामुळे या पावसाची शक्यता? 

आज पूर्व मध्य अरबी समुद्रात, मुंबईच्या नैऋत्यला ४०० किमी. अंतरावर कमी दाब क्षेत्राचे तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर झाल्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात या मध्यम पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. येत्या पाच दिवसात त्याचे उत्तर व ईशान्यकडे मार्गक्रमाणची शक्यता जाणवते.

आग्नेय बंगालच्या उपसागारातील कमी दाब क्षेत्राचे उद्या मध्य बंगालच्या उपसागारात मार्गक्रमण होवून तीव्र कमी दाब क्षेत्रात रूपांतर व २६ तारखेला चक्रीवादळ व २८ तारखेला तीव्रचक्रीवादळात रूपांतर होण्याच्या शक्ययेमुळे दक्षिण भारताबरोबर महाराष्ट्रातही पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. 

विशेषतः धुळे, नंदुरबार, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, सातारा सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीड, धाराशिव, लातूर, अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता जाणवते. 

- माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Rains: Why is it raining and until when?

Web Summary : Low-pressure areas in the Arabian Sea and Bay of Bengal are causing rains in Maharashtra until October 31st. Heavy rainfall is expected in several districts. Meteorologist Manikrao Khule provided the information.
टॅग्स :हवामान अंदाजपाऊसमोसमी पाऊसमहाराष्ट्रशेती क्षेत्र