Join us

Maharashtra Rain : 21 जुलैपासून ते पहिल्या श्रावणी सोमवारपर्यंत 'या' जिल्ह्यात मुसळधार, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 18:50 IST

Maharashtra Rain : उद्या सोमवार दि. २१ जुलै (लहान एकादशी) पासुन पहिला श्रावणी सोमवार दि. २८ जुलैपर्यंत जोरदार पावसाची शक्यता आहे.

Maharashtra Rain :    उद्या सोमवार दि. २१ जुलै (लहान एकादशी) पासुन आठवडाभर म्हणजे पहिला श्रावणी सोमवार दि. २८ जुलैपर्यंत महाराष्ट्रातील मुंबईसह संपूर्ण कोकण (विशेषतः सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड अशा ३ जिल्ह्यात), संपूर्ण विदर्भ (विशेषतः अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ अशा ८ जिल्ह्यात) 

तसेच नाशिक, अ.नगर, पुणे, सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरील पेठ, त्र्यंबकेश्वर, नाशिक, इगतपुरी, जुन्नर, लोणावळा, खंडाळा, मावळ, मुळशी, वेल्हे, भोर, महाबळेश्वर, जावळी, पाटण, शाहूवाडी, बावडा, राधानगरी, चांदगड तालुक्याच्या क्षेत्रात व लगतच्या परिसरात... 

तसेच नंदुरबार, जळगांव, धुळे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर व मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड, परभणी अशा १० जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.  

आता तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊसमराठवाड्यातील छ.सं.नगर, जालना, बीड, हिंगोली जिल्ह्यात आणि सह्याद्रीच्या पूर्वेकडील घाटा खालील वर्षच्छायेच्या प्रदेशातील नाशिक, अ.नगर, पुणे, सातारा  जिल्ह्यातील तालुक्यात २१ ते २८ जुलैच्या आठवड्यात मात्र केवळ तुरळक ठिकाणीच किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. 

जुलै महिन्याचा अंदाज व सध्यस्थिती- दि.११ ते २४ जुलै दरम्यानच्या दोन आठवड्यात कोकण व विदर्भ वगळता संपूर्ण खान्देश, मध्य- महाराष्ट्र व मराठवाडा अशा एकूण १८ जिल्ह्यात अंदाजानुसार तुरळक ठिकाणी किरकोळ पाऊस वजा जाता उघडीपच जाणवत आहे. परंतु त्याच्या तीन दिवस अगोदरच म्हणजे उद्या सोमवार दि २१ जुलैपासुन पावसाचे वातावरण होत आहे.                 जुलै महिन्यात, महाराष्ट्रासाठी, सरासरीपेक्षा अधिक असा व्यक्त केलेल्या मासिक पावसाचा अंदाजाची पूर्तता, येणाऱ्या १० दिवसातील, मध्यम ते जोरदार पावसामुळे होण्याची शक्यता जाणवते.             नद्यांच्या खोऱ्यातील जल आवक व धरणे संचय साठा स्थिती- सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर उगम पावणाऱ्या महाराष्ट्रातील गोदावरी, गिरणा, वैतरणा, कश्यपी, कडवा, प्रवरा, भीमा, नीरा, इंद्रायणी, मुळा मुठा कुकडी कृष्णा-कोयना, पंचगंगा वारणा दूधगंगा भोगावती नद्यांच्या खोऱ्यात मात्र मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यतेमुळे या नद्यांच्या पात्रात पुन्हा एकदा पूर पाण्याच्या विसर्गासह, धरणांच्या जलसाठ्याच्या टक्केवारीतही ह्या २१ ते २८ जुलैच्या आठवड्यात वाढ होण्याची शक्यता जाणवते. त्यामुळे नजीकच्या काळात जायकवाडी धरणही त्याच्या शतकी जलसाठ्याकडे झेपवण्याची शक्यता जाणवते. 

- माणिकराव खुळे Meteorologist (Retd)IMD Pune.

टॅग्स :पाऊसहवामान अंदाजमहाराष्ट्रमोसमी पाऊसशेती क्षेत्र