Maharashtra Rain : अजुन ऑक्टोबरचा अर्धा महिना शिल्लक असुन या अर्ध्या महिन्यात, पावसाच्या शेवटच्या दोन आवर्तनातून महाराष्ट्रात रब्बीला लाभदायक ठरेल, अशा मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता जाणवते. उद्या बुधवार दि. १५ ऑक्टोबर ते सोमवार दि. २० ऑक्टोबर (नरक चतुर्दशी) दरम्यानच्या सहा दिवसात महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहून भाग बदलत तुरळक ठिकाणी मध्यम ते किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. त्यातही उद्यापासून म्हणजे बुधवार-गुरुवार दि. १५ व १६ ऑक्टोबर च्या दोन दिवशी पावसाचा प्रभाव अधिक जाणवेल.
वाचा जिल्हानिहाय कुठल्या तारखेला कुठे पाऊस?
बुधवार दि. १५ ऑक्टोबर - चंद्रपूर, गडचिरोली, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, परभणी, जालना, बीड, लातूर, धाराशिव, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर.
गुरुवार दि. १६ऑक्टोबर - जळगांव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पश्चिम छ संभाजीनगर, पूर्व अमरावती, बुलढाणा, अकोला, सह्याद्री घाटमाथा व रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
शुक्रवार दि. १७ ऑक्टोबर - बुलढाणा, धुळे, नाशिक, सह्याद्री घाटमाथा, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छ संभाजीनगर, हिंगोली.
शनिवार दि. १८ ऑक्टोबर - सह्याद्री घाटमाथा, अहिल्यानगर, सोलापूर, नांदेड, लातूर, बीड, धाराशिव.
रविवार -सोमवार दि.१९-२० ऑक्टोबर - सह्याद्री घाटमाथा, नाशिक, अहिल्यानगर, छ संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, नांदेड, परभणी, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली.
मंगळवार दि.२१ ऑक्टोबर - मुंबईसह संपूर्ण, कोकण, मध्य महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भ
सध्या परतीच्या मान्सूनची स्थिती कशी आहे? नैऋत्य मान्सूनने आज परतीच्या प्रवासात पुढील मजल गाठून आता केवळ तेलंगणा, छत्तीसगड व ओरिसा अशा ३ राज्यातून बाहेर पडावयाचे आहे. मान्सून ची आजची सीमा रेषा कारवार, कलबुर्गी, निझामाबाद, कांकर, चांदबली या शहरातून जात आहे. देशाच्या एकूण परतीच्या क्षेत्रापैकी ९५ टक्के भागातून मान्सून परतलेला आहे. दरवर्षी मान्सून साधारणत: देशातून सरासरी १५ ऑक्टोबरच्या दरम्यान बाहेर पडतो. येत्या दोन दिवसात देशाच्या उर्वरित ५ टक्के भुभागावरून आपला पाय काढता घेईल, असे वाटते. तसेच येत्या २ दिवसात नैऋत्य मान्सून निरोप घेताच, देशाच्या दक्षिणेतील राज्यात ईशान्य (हिवाळी) मान्सून ला सुरवात होण्याची शक्यता जाणवते.
- माणिकराव खुळेMeteorologist (Retd)IMD Pune.
Web Summary : Maharashtra anticipates rain from October 15th-20th, benefiting Rabi crops. Specific districts will experience varying rainfall. The monsoon is retreating, paving way for the northeast monsoon.
Web Summary : महाराष्ट्र में 15-20 अक्टूबर तक बारिश की संभावना है, जिससे रबी फसलों को लाभ होगा। विशिष्ट जिलों में अलग-अलग बारिश होगी। मानसून पीछे हट रहा है, जिससे पूर्वोत्तर मानसून का मार्ग प्रशस्त हो रहा है।