Maharashtra Dam Storage : मागील दोन दिवस झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक धरणांमध्येपाणीसाठा कमालीचा वाढला आहे. आज २२ जिल्ह्यातील धरणांमध्ये किती पाणी आहे हे सविस्तर पाहूयात...
आजमितीस मराठवाड्यातील सीनाकोळे, उजनी, पुणे विभागातील भाटघर, कोकण विभागातील मोराब्बे, मुंबई महानगरपालिकेतील विहार, तुलसी, मोडकसागर, नाशिक विभागातील पांझरा, मन्याड तर अहिल्यानगर जिल्ह्यातील सीना, आढळा ही धरण १०० टक्के भरले आहेत.
इतर धरणांचा पाणीसाठा पाहुयात...अहिल्या नगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण ९८.३५ टक्के, निळवंडे धरण ९८.८० टक्के, भोजापुर धरण ९७.५१ टक्के, डिंभे धरण ९६.०८ टक्के, विसापूर धरण ९८.६३ टक्के भरले आहे.
नाशिक विभागातीलगंगापूर धरण ९३.६२ टक्के, दारणा धरण ९४.६१ टक्के, पालखेड धरण ८२.७० टक्के, करंजवण धरण ९३.२४ टक्के, गिरणा धरण ७१. ६४ टक्के, हातनुर धरण ३८.६३ टक्के, उकळी धरण ७४.४९ टक्के भरले आहे.
मराठवाडा विभागातीलजायकवाडी धरण ९७.५० टक्के, कोयना धरण ९३.८४ टक्के, दूधगंगा धरण ८४.८२ टक्के, राधानगरी धरण ९९.०३ टक्के, अलमट्टी धरण ७५.३३ टक्के, पेन धरण ९७.६२ टक्के, दूधना धरण ७१.६२ टक्के, सिद्धेश्वर धरण ९४.९४ टक्के भरले आहे.
कोकण विभागातील भातसा धरण ९४.८५ टक्के, अप्पर वैतरणा धरण ९६.४१ टक्के, बारवे धरण ९९.९८ टक्के, तिलारी धरण ८८.०५ टक्के, हेटवणे धरण ९८.८३ टक्के, भरले आहे. पुणे विभागातील चासकमान धरण ९८.७३ टक्के, पानशेत धरण ९५.२९ टक्के, खडकवासला धरण ७४.३० टक्के, मुळशी धरण ९७. ०८ टक्के भरले आहे.
नागपूर विभागातील गोसेखुर्द धरण ४२.४१ टक्के, तोतला डोह धरण ७३.९० टक्के, खडकपूर्णा धरण ८८.१८ टक्के, काटेपूर्णा धरण ८८.४१ टक्के, अरुणावती धरण ७२.२७ टक्के भरले आहे.
Nashik Dam Storage : दोन दिवस मुसळधार, नाशिक जिल्ह्यांत 11 धरणे हाऊसफुल, वाचा संपूर्ण पाणीसाठा