Join us

राज्यातील 'ही' पाच मोठी धरणे शंभर टक्के भरली, मात्र 'हा' विभाग अजूनही तहानलेलाच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 12:59 IST

Maharashtra Dam Storage :  आज २७ जुलै २०२५ पर्यंत राज्यातील एकूण धरणांमध्ये जवळपास ६८.४७ टक्के जलसाठा जमा झाला आहे.

Maharashtra Dam Storage :    आज २७ जुलै २०२५ पर्यंत राज्यातील एकूण धरणांमध्ये जवळपास ६८.४७ टक्के जलसाठा असून मागील वर्षी हा जलसाठा ५२.५० टक्के इतका होता. आजमितीस धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे, हे पाहुयात...

सुरुवातीला विभागणीय धरणांचा पाणीसाठा पाहिला तर नागपूर विभागात ५६.६४ टक्के, अमरावती विभागात ५५.७३ टक्के, छत्रपती संभाजी नगर विभागात ५३.१२ टक्के, नाशिक विभागात ६३.२१ टक्के, पुणे विभागात ८०.७३ टक्के तर कोकण विभागात सर्वाधिक ८४.३४ टक्के असा जलसाठा आहे. यानुसार छत्रपती संभाजी नगर विभागात सर्वात कमी पाणीसाठा असल्याचं दिसून येत आहे. 

आता काही प्रमुख धरणांचा पाणीसाठा पाहुयात..

जायकवाडी धरणात एकूण ८६.३४ टक्के जलसाठा असून ८१.६९ टक्के जलसाठा हा उपयुक्त आहे. तसेच उजनी धरणात उपयुक्त जलसाठा ९६.२६ टक्के तर कोयना धरणात ७९.६४ टक्के जलसाठा आहे त्याचबरोबर अलमट्टी धरणात ७५.८० टक्के,  तर राधानगरी धरण ९९.०५ टक्क्यांवर आहे. 

तसेच गंगापूर धरण ७०.५२ टक्के, गिरणा धरण ५६.६३ टक्के, भंडारदरा धरण ८६.४३ टक्के, निळवंडे ८८.५६ टक्के, भातसा धरण ९०.४६ टक्के, चासकमान धरण ९२.९७ टक्के, खडकवासला धरण ६९.५२ टक्के इतके भरले आहे. तर जवळपास पाच धरणे शंभर टक्के भरली आहेत. 

- इंजि. हरिश्चंद्र र चकोर (सेवानिवृत्त का. अभियंता) जलसंपदा विभाग, अहिल्यानगर.                      

टॅग्स :जायकवाडी धरणउजनी धरणगंगापूर धरणधरणमहाराष्ट्र