Join us

Jayakwadi Dam Water Release : जायकवाडी धरणात पाण्याचा विसर्ग वेग वाढला; गोदावरी खोऱ्यात धोका? वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2025 13:00 IST

Jayakwadi Dam Water Release : जायकवाडी (नाथसागर) जलाशय ९९ टक्के भरल्याने शनिवारी रात्रीपासून धरणातून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. पाण्याचा जोर वाढल्याने पाचव्यांदा आपत्कालीन दरवाजे उघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Jayakwadi Dam Water Release)

Jayakwadi Dam Water Release : राज्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणातून (नाथसागर जलाशय) पाण्याचा विसर्ग सातत्याने वाढत असून शनिवारी (२८ सप्टेंबर) रात्रीपर्यंत तब्बल १ लाख १३ हजार १८४ क्युसेक पाणी गोदावरी पात्रात सोडण्यात आले. (Jayakwadi Dam Water Release)

धरण पूर्ण क्षमतेने भरले असल्याने सर्व २७ दरवाजे उघडण्यात आले असून, गोदावरीनदीच्या पात्रालगतच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.(Jayakwadi Dam Water Release)

धरणाची स्थिती 

सध्याची पाण्याची पातळी : १५२१.२५ फूट (४६३.६७७ मी.)

एकूण साठा क्षमता : २९०९.०४१ दलघमी (१०२.७३ TMC)

सध्याचा एकूण साठा : २८१९.४८३ दलघमी (९९.५६ TMC)

जिवंत पाणी साठा :२०८१.३७७ दलघमी (७३.४९ TMC)

साठ्याचे टक्केवारी : ९५.८७%

आवक-विसर्ग स्थिती

धरणात आवक (Inflow) : १,०३,७३४ क्युसेक (२९३७.४२ क्युमेक)

एकूण विसर्ग (Discharge) : १,१३,१८४ क्युसेक (३२०५.०१ क्युमेक)

सांडव्याद्वारे : १,१३,१८४ क्युसेक

जलविद्युत केंद्र, उजवा कालवा व माजलगाव धरणाकरिता विसर्ग : शून्य

दरवाज्यांची स्थिती

एकूण दरवाजे : २७

उघडलेले दरवाजे : २७ (१० ते २७ पूर्णपणे, तर १ ते ९ प्रत्येकी ४ फूट उंचीने उघडलेले)

पूरस्थितीची शक्यता

धरणात सतत वाढणारी आवक लक्षात घेता प्रशासनाने पाचव्यांदा आपत्कालीन दरवाजे उघडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे पैठण, वैजापूर, गंगापूर, कन्नड, औरंगाबादसह गोदावरी पात्रालगतच्या गावांना पूराचा धोका निर्माण झाला आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागात जाणे टाळावे, जनावरे व घरगुती साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.

प्रशासनाचा इशारा

नदीपात्र व पूल ओलांडण्याचा धोका घेऊ नका

शेतकरी व नागरिकांनी शेतमाल व पशुधन सुरक्षित ठिकाणी हलवावे

आपत्कालीन परिस्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा

हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam water Release : जायकवाडी धरणातून विसर्गात वाढ; शहागडचा कोल्हापुरी बंधारा पाण्याखाली

English
हिंदी सारांश
Web Title : Increased discharge from Jayakwadi raises flood risk in Godavari basin.

Web Summary : Jayakwadi Dam's discharge increased to 1.13 lakh cusecs, prompting flood alerts for Godavari basin villages. All 27 gates are open due to near-full capacity. Emergency gates may open. Residents are urged to move to safety.
टॅग्स :शेती क्षेत्रजायकवाडी धरणपाणीधरणगोदावरीनदी