Join us

Jayakwadi Dam Water Release : जायकवाडीचे दरवाजे उघडले; ३७ हजार क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 09:42 IST

Jayakwadi Dam Water Release : पैठण परिसरात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जायकवाडी धरणातील पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी सायंकाळी धरणाचे १८ दरवाजे दोन फुटांनी उघडून तब्बल ३७ हजार ७२८ क्युसेसने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. (Jayakwadi Dam Water Release)

Jayakwadi Dam Water Release : जायकवाडी धरण परिसर आणि पाणलोट क्षेत्रात मागील तीन दिवसांपासून सुरू असलेल्या सलग पावसामुळे धरणातील पाण्याची आवक लक्षणीयरीत्या वाढली आहे. (Jayakwadi Dam Water Release)

त्यामुळे जलसंपदा विभागाने बुधवारी सायंकाळी धरणाचे १८ दरवाजे दोन फूटाने उघडून तब्बल ३७ हजार ७२८ क्युसेसने विसर्ग सुरू केला आहे.(Jayakwadi Dam Water Release)

बुधवारी सकाळी ८ वाजता १८ हजार ८६४ क्युसेस वेगाने विसर्ग सुरू होता. मात्र, दिवसभरात धरणात येणारी आवक सातत्याने वाढल्याने सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास विसर्ग दुप्पट करण्यात आला.

सध्या गोदावरी नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जलपातळी वाढत असून, जर पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर रात्रीतून विसर्ग आणखी वाढवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गोदावरी किनाऱ्यावरील गावांमध्ये ग्रामपंचायती व स्थानिक प्रशासनाने पूर्वतयारी केली आहे.

जायकवाडी धरणाची सध्याची स्थिती 

उघडलेले दरवाजे : १८

विसर्ग : ३७,७२८ क्युसेस

सकाळीचा विसर्ग : १८,८६४ क्युसेस

संभाव्य वाढ : पावसावर अवलंबून

सावधानतेचा इशारा 

नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात किंवा काठावर जाणे टाळावे, तसेच प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाने केले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam Water Release : धरण ओसंडले! जायकवाडीमधून २८ हजार क्युसेक विसर्ग वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : 37,000 Cusecs Released from Jayakwadi Dam Due to Heavy Rainfall

Web Summary : Jayakwadi Dam releases 37,000 cusecs into Godavari River following heavy rainfall in the catchment area. The release from 18 gates was increased in the evening due to rising water levels. Further increases are possible if the inflow continues to rise overnight.
टॅग्स :शेती क्षेत्रजायकवाडी धरणधरणपाणीगोदावरीनदी