Join us

Jayakwadi Dam Update : जायकवाडीचा जलसाठा वाढतोय; सिंचनाचा प्रश्न सुटणार वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 10:40 IST

Jayakwadi Dam Update : नाशिकच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली असून जायकवाडी धरणाला मोठा दिलासा मिळाला आहे. अवघ्या आठ दिवसांत धरणातील साठा ६० टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. यामुळे मराठवाड्यासह परिसरातील पिण्याचे आणि सिंचनाचे संकट दूर होण्याची चिन्हे आहेत. (Jayakwadi Dam Update)

Jayakwadi Dam Update : नाशिकच्या मुसळधार पावसामुळे गोदावरी दुथडी भरून वाहू लागली असून जायकवाडी धरणाला मोठा दिलासा मिळाला आहे. अवघ्या आठ दिवसांत धरणातील साठा ६० टक्क्यांच्या घरात पोहोचला आहे. (Jayakwadi Dam Update)

गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदी दुथडी भरून वाहू लागली असून जायकवाडी धरणाला मोठा आधार मिळाला आहे. यामुळे मराठवाड्यासह परिसरातील पिण्याचे आणि सिंचनाचे संकट दूर होण्याची चिन्हे आहेत.(Jayakwadi Dam Update)

नाशिकच्या पावसामुळे गोदावरीत आलेल्या पुराच्या लाटेमुळे मंगळवारी (८ जुलै) जायकवाडी धरणाचा साठा तब्बल ६०.७१% पर्यंत पोहोचला आहे.(Jayakwadi Dam Update)

धरणात ५३ हजार ३३४ क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू असून पाण्याची पातळी १ हजार ५१४ फुटांवर पोहोचली आहे. १ जुलै रोजी जायकवाडीचा साठा फक्त ४४.६४ टक्के होता, तो अवघ्या आठ दिवसांतच मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. धरणात एकूण पाणीसाठा सध्या २०५६.०८३ दलघमी, तर जिवंत पाणीसाठा १३१७.९७७ दलघमी इतका झाला आहे.(Jayakwadi Dam Update)

जूनपासून २२ टीएमसी पाणी

१ जूनपासून आतापर्यंत जायकवाडीमध्ये एकूण २२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. मागील वर्षी याच तारखेला धरणाचा उपयुक्त साठा केवळ ४.०६% होता. यंदा पावसाच्या सुरळीत आगमनामुळे साठ्याचा आकडा समाधानकारक आहे.

पिण्याच्या व सिंचनाच्या पाण्याचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

धरण लवकरच १०० टक्के भरल्यास छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागांचा पिण्याचे पाणी, सिंचन व औद्योगिक गरजा भागणार आहेत. त्यामुळे शेतकरी व नागरिकांत समाधानाचं वातावरण आहे.

पाच वर्षांत चारदा १०० टक्के भरले धरण

जायकवाडी धरणाने मागील पाच वर्षांत (२०१९, २०२०, २०२१, २०२२, २०२४) तब्बल चारदा १०० टक्के साठा गाठला. मात्र २०२३ मध्ये केवळ ४७.२३ टक्के पाणीसाठा झाला होता. यंदा पावसाच्या सुरुवातीच्या दमदार हजेरीमुळे धरण १०० टक्के भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

जायकवाडी जलसाठा

तपशीलमंगळवार (८ जुलै २०२५)
पाणीसाठा६०.७१%
पाणी पातळी१,५१४ फूट
आवक५३,३३४ क्युसेक
एकूण साठा२०५६.०८३ दलघमी
जिवंत साठा१३१७.९७७ दलघमी
जूनपासून आलेले पाणी२२ टीएमसी

शेतकऱ्यांना दिलासा

या पावसामुळे खरीप हंगामात उशीर होणार नाही, तसेच पुढील काळात सिंचनाच्या पाण्याचा तुटवडा भासणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. गोदावरीच्या पुरामुळे काही भागांत सतर्कतेची आवश्यकता असून प्रशासनाने नागरिकांना सुरक्षिततेसाठी सूचना केल्या आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam Update : गोदामाई दुथडी भरून वाहतेय; जाणून घ्या जायकवाडीचा जलसाठा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रजायकवाडी धरणपाणीधरणपाटबंधारे प्रकल्प