Join us

Jayakwadi Dam Update : जायकवाडी धरणाचे आपत्कालीन गेट्स उघडले; जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 11:35 IST

Jayakwadi Dam Update : पावसामुळे वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे जायकवाडी धरण (नाथसागर जलाशय) प्रशासनाने आज सकाळी सर्व आपत्कालीन गेट्स उघडण्याचा निर्णय घेतला. (Jayakwadi Dam Update)

Jayakwadi Dam Update : पावसामुळे वाढलेल्या पाणीसाठ्यामुळे जायकवाडी धरण (नाथसागर जलाशय) प्रशासनाने आज सकाळी सर्व आपत्कालीन गेट्स उघडण्याचा निर्णय घेतला.  (Jayakwadi Dam Update)   

पहाटेपासून झालेल्या आवकेमुळे धरणाची पातळी धोक्याजवळ पोहोचल्याने ६:३० ते ०७:०० या वेळेत गेट क्रमांक १० ते २७ अशी १८ आपत्कालीन गेट्स ०.५ फूट ते ४.५ फूट उचलून पाणी सोडण्यात आले. (Jayakwadi Dam Update)   

जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात आला आहे. सकाळी सर्व आपत्कालीन दरवाजे ४.५ फूट उघडण्यात आले असून, एकूण ११३,१८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. (Jayakwadi Dam Update)   

सध्याचा विसर्ग

नियमित सांडव्याद्वारे : १,०३,७५२ क्युसेक

आपत्कालीन गेट्समधून : ९,४३२ क्युसेक

एकूण विसर्ग : १,१३,१८४ क्युसेक

पाटबंधारे विभागाने सांगितले की, धरणात होणाऱ्या आवकेनुसार विसर्गाचा वेग नियंत्रित केला जाईल आणि परिस्थितीनुसार वाढ अथवा घट केली जाईल.

नदीकाठच्या नागरिकांसाठी सूचना

गोदावरी नदीपात्रातील पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या सर्व गावांनी सतर्क राहावे.

शेतकरी व नागरिकांनी नदी पात्रात किंवा पूलाखाली जाणे टाळावे.

शेतीतील अवजारे, पंप, जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत.

आपत्कालीन स्थितीत स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.

मराठवाड्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे जायकवाडी धरण क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. धरण पूर्ण क्षमतेजवळ आल्याने धरणाची सुरक्षितता लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येतो आहे.

शेतकऱ्यांसाठी सूचना

गोदावरी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेत शेतातील पिकांचे रक्षण करण्याचे नियोजन करावे.

उघड्या शेतात ठेवलेली उपकरणे, ट्रॅक्टर, पंपसेट्स वगैरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत.

नदी पात्रातील जनावरे लगेच बाहेर काढावीत.

हे ही वाचा सविस्तर : Jayakwadi Dam Update : जायकवाडी धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग; किती उघडले दरवाजे वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रजायकवाडी धरणधरणपाणीगोदावरीनदी