Join us

Jayakawadi Dam Water : जायकवाडी भरले; १.८ लाख हेक्टर शेतीला दिलासा वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:45 IST

Jayakawadi Dam Water : यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडी प्रकल्प ९२ टक्के भरल्याने मराठवाड्यातील तब्बल १.८ लाख हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी ७ आवर्तनांतून नियोजित पाणीपुरवठा केला जाणार आहे. (Jayakawadi Dam Water)

Jayakawadi Dam Water : यंदाच्या पावसाळ्यात जायकवाडी प्रकल्प ९२ टक्के भरल्याने मराठवाड्यातील तब्बल १.८ लाख हेक्टर शेतीला पाणी मिळणार आहे. रब्बी आणि उन्हाळी हंगामासाठी ७ आवर्तनांतून नियोजित पाणीपुरवठा केला जाणार आहे. (Jayakawadi Dam Water)

राज्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात यंदा ९२ टक्के जलसाठा झाल्याने रब्बी आणि उन्हाळी हंगामात एकूण १ लाख ८० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. (Jayakawadi Dam Water)

लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) कार्यालयाने रब्बीसाठी ४ आणि उन्हाळी हंगामासाठी ३ अशा एकूण ७ आवर्तनांतून पाणीपुरवठ्याचा निर्णय घेतला आहे. (Jayakawadi Dam Water)

गेल्या आठवड्यात धरणातून नदीपात्रात आणि उजव्या कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले होते. अजून दोन महिने पावसाचा हंगाम बाकी असल्याने प्रकल्पाच्या उर्ध्व भागात पाऊस पडल्यास गोदापात्राद्वारे साठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. (Jayakawadi Dam Water)

कडा कार्यालयाचे अधीक्षक अभियंता एस. के. सब्बीनवार यांनी सांगितले की, रब्बी हंगामात सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा केला जाणार असून, उन्हाळी हंगामात ८० हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.  (Jayakawadi Dam Water)

शेतीला नियोजित प्रमाणात पाणी मिळावे यासाठी रब्बी हंगामात ४ आणि उन्हाळ्यात ३ अशी आवर्तने सोडली जातील. या संदर्भातील अंतिम निर्णय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होईल. (Jayakawadi Dam Water)

जायकवाडी प्रकल्पातील जलसाठा व सिंचनाचे तपशील

९२% जलसाठा भरलेला

१,८०,००० हेक्टर – एकूण सिंचनाखाली येणारे क्षेत्र

१,००,००० हेक्टर – रब्बी हंगामातील सिंचित क्षेत्र

८०,००० हेक्टर – उन्हाळी हंगामातील सिंचित क्षेत्र

हे ही वाचा सविस्तर :  Jayakwadi Dam Water : जायकवाडी अपडेट: धरणातून पाण्याचा विसर्ग घटला, १० दरवाजे बंद

टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीजायकवाडी धरणपाटबंधारे प्रकल्प