Join us

Isapur Dam Water Storage : इसापूर धरणाचे ५ दरवाजे उघडले; पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 18:45 IST

Isapur Dam Water Storage : मागील आठवड्यात हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस थांबला असला तरी इसापूर धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच असून, धरणाचे ५ दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे. यामुळे नदीकिनाऱ्यावरील नागरिक आणि शेतकरी सजग राहण्याची गरज आहे. (Isapur Dam Water Storage)

Isapur Dam Water Storage : मागील आठवड्यात हिंगोली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस थांबला असला तरी इसापूर धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच असून, धरणाचे ५ दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.(Isapur Dam Water Storage)

यामुळे नदीकिनाऱ्यावरील नागरिक आणि शेतकरी सजग राहण्याची गरज आहे.(Isapur Dam Water Storage)

हिंगोली जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस थांबला असला तरी इसापूर धरणामध्ये पाण्याची आवक सुरूच असून, धरणाचे ५ दरवाजे उघडून पैनगंगा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग केला जात आहे.(Isapur Dam Water Storage)

यामुळे पैनगंगा नदीला पुन्हा एकदा पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.जिल्ह्यात तीन प्रमुख सिंचन प्रकल्प आहेत, जे पिण्याचे पाणी आणि शेतकऱ्यांसाठी सिंचन सुविधा उपलब्ध करून देतात.(Isapur Dam Water Storage)

मागील आठवड्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाली होती, ज्यामुळे धरणातील पाणीसाठा भरून गेला. पाण्याची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी इसापूर धरणाचे ५ सांडव्य गेट ०.५० मीटर उघडले गेले असून, ५ गेटच्या साह्याने पैनगंगा नदी पात्रात ८४२० क्युसेस पाण्याचा विसर्ग केला जात आहे.(Isapur Dam Water Storage)

विशेष म्हणजे, धरणात सध्या पाणी सतत येत आहे, त्यामुळे पाण्याचे प्रमाण सतत वाढत राहण्याची शक्यता आहे. यामुळे नदीकिनाऱ्यावरील लोकांनी आणि शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.(Isapur Dam Water Storage)

धरणातील सध्याचे पाणीसाठे (२३ ऑगस्ट २०२५)

धरण

उपयुक्त साठा (दलघमी)टक्केवारी (%)
इसापूर प्रकल्प२४४.९७९८.०२
येलदरी धरण७८३.९४९९६.८१
सिद्धेश्वर प्रकल्प७९.१७३९७.७९

धरणातील पाणीसाठा जवळपास जिवंत साठ्याजवळ पोहोचला आहे, त्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरू ठेवणे आवश्यक आहे. स्थानिक प्रशासनाने पाण्याच्या प्रवाहावर लक्ष ठेवण्याचे काम सुरु केले आहे आणि नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारी घेतल्यास सुरक्षित राहता येईल.

शेतकरी आणि नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी पाणी सतत वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन, आपली शेतजमीन आणि घर सुरक्षित करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे.

हे ही वाचा सविस्तर : Manjara Dam Water Storage : मांजरा धरण ओव्हरफ्लो: लातूर व कर्नाटकातील १५२ गावांना अलर्ट वाचा सविस्तर

टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीहिंगोलीशेतकरीशेती