Cold Weather : आज जेऊरला १० अंश से. इतके किमान तापमान नोंदवून तेथे थंडीची लाट अनुभवली गेली. हे किमान तापमान सरासरीपेक्षा जवळपास पाच डिग्रीने खालावलेले आहे. जेऊरचे कमाल तापमानही ३१ अंश से. नोंदवून सरासरीच्या २.१ अंश से.ने हे तापमान खालावलेले आहे.
यावरून एका शेतकऱ्याने एक प्रश्न विचारला की, अगोदर अहिल्यानगरला सर्वात कमी तापमान असायचे. नंतर निफाड, जळगाव, मग आता जेऊर कसे? तर जेऊर हे करमाळा तालुका जिल्हा सोलापूर, अहिल्यानगर जिल्ह्याच्या सीमेवर लागून असलेले गांव असुन त्याची भौगोलिक रचना जवळपास अहिल्यानगर शहरासारखीच आहे.
आज जेऊरला सकाळी ०८:३० ला हवामान घटकांच्या निरीक्षणाची नोंद करतांना महाराष्ट्रात सगळ्यात कमी सापेक्ष आर्द्रता जेऊरला ५७ टक्के नोंदली गेली आहे. तर परभणी ला ५३ टक्के नोंदवली गेली आहे.
सापेक्ष आर्द्रता हवेत सामावलेले पाण्याचे प्रमाण म्हणजेच हवेतील कोरडे पणा दर्शवते. सध्या ह्या तेथील कोरडेपणानेच तेथील पहाटे ५ चे किमान तापमान घटवले आहे.
एखाद्या ठराविक तापमानाला
सापेक्ष आर्द्रता= (हवेत प्रत्यक्षात असलेल्या पाण्याच्या वाफेचे वजन ÷ त्या हवेत जास्तीत जास्त पाण्याची वाफ सामावू शकते, तिचे वजन ) X१००%
- माणिकराव खुळे
Meteorologist (Retd )
IMD Pune.
