Lokmat Agro >हवामान > Gangapur Dam : नाशिकचे गंगापूर धरण किती टक्क्यांवर? जिल्ह्यात किती पाणीसाठा शिल्लक? 

Gangapur Dam : नाशिकचे गंगापूर धरण किती टक्क्यांवर? जिल्ह्यात किती पाणीसाठा शिल्लक? 

Latest News How much water is left in Gangapur Dam of Nashik see details nashik district dam storage | Gangapur Dam : नाशिकचे गंगापूर धरण किती टक्क्यांवर? जिल्ह्यात किती पाणीसाठा शिल्लक? 

Gangapur Dam : नाशिकचे गंगापूर धरण किती टक्क्यांवर? जिल्ह्यात किती पाणीसाठा शिल्लक? 

Gangapur Dam : गंगापूर धरण (Gangapur Dam) 'इतक्या' टक्क्यांवर असून मागील वर्षी याच महिन्यात ४४.४४ टक्के होते.

Gangapur Dam : गंगापूर धरण (Gangapur Dam) 'इतक्या' टक्क्यांवर असून मागील वर्षी याच महिन्यात ४४.४४ टक्के होते.

शेअर :

Join us
Join usNext

नाशिक : लहरी पावसाचा अनुभव घेणाऱ्या नाशिक जिल्ह्यात (Nashik District) मागील वर्षी २७ टक्के अधिक पाऊस झाल्याने यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा आहे.

गंगापूर धरण (Gangapur Dam) ६०.११ टक्क्यांवर असून मागील वर्षी याच महिन्यात ४४.४४ टक्के होते. एप्रिलमधील आकडेवारीनुसार, सद्यस्थितीत ३८.३६ टक्के इतका जलसाठा असून, मागील वर्षीच्या तुलनेत हा साठा ९ टक्के अधिक असल्याने धरणांची स्थिती बरी असल्याचे दिसते.

सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झालेल्या नाशिक जिल्ह्यातील (Nashik District Dam Storage) धरणांची स्थिती समाधानकारक असून, जिल्ह्यात सद्यस्थितीत ३७.०८ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी याच महिन्यात २७.०१ टक्के इतका जलसाठा शिल्लक होता. म्हणजेच यंदा १० टक्के अधिक जलसाठा शिल्लक आहे. गंगापूर धरण समुहात सध्या ५३.३२ टक्के, पालखेड धरण समुहात ४.९९, तर गिरणा खोरे समुहात ५८.६७ इतका जलसाठा शिल्लक आहे.

पालखेड, गिरणा खोरे मात्र काठावर
मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पालखेड आणि गिरणा खोऱ्यातील पाण्याची स्थिती काठावर आहे. पालखेड धरण समुहात गतवर्षी या महिन्यात ५.२६ टक्के साठा शिल्लक होता. यंदा हा साठा ४.७१ आहे. गिरणा खोऱ्यात मागील वर्षी एप्रिल महिन्यात ५६.८२ टक्के इतका जलसाठा होता. यंदा ५८.३० इतका साठा शिल्लक आहे.

गंगापूर धरण समूह समृद्ध
गंगापूर धरण समुहातील गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी आणि आळंदी या धरणांमध्ये मुबलक पाणीसाठा शिल्लक असून, एकूण टक्केवारी ५३.३२ इतकी आहे. मागील वर्षी समुहाची एप्रिल महिन्यातील टक्केवारी ४०.३८ इतकी होती. म्हणजेच यंदा १३ टक्के अधिक आहे.

Web Title: Latest News How much water is left in Gangapur Dam of Nashik see details nashik district dam storage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.