Gangapur Dam : गंगापूर धरण व गंगापूर धरण (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू आहे. त्यामुळे गंगापूर धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. गंगापूर धरणातून दुपारी १ वाजता ४ हजार ३९७ क्युसेक्स विसर्ग सोडण्यात आलेला होता.
दुपारी ३ वाजता तो ६ हजार ३४० क्युसेक्स करण्यात आला आहे. तसेच धरणातल्या पाणी आवकानुसार विसर्ग टप्या टप्याने वाढवण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.
तसेच दारणा धरणातून सुरु असलेला १० हजार ५८४ क्युसेक्स विसर्ग हा दुपारी १ वाजता ४ हजार २१२ क्युसेक्स ने वाढ करून एकूण १४ हजार ४९६ क्युसेक्स सोडण्यात येणार आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात येत आहे. तरी प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी.
नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यामधुन विसर्गात वाढ नांदुर मध्यमेश्वर बंधाऱ्यामधुन ६ हजार ३१० क्युसेक्स ने विसर्ग सुरु होता. यात वाढ करून दुपारी १२ वाजेपासून १२ हजार ६२० क्युसेक्स सोडण्यात आला आहे. सदर विसर्गाची टप्याटप्याने वाढ होण्याची शक्यता आहे. पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी गोदावरी नदीपात्रालगतच्या परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
इतर धरणांमधून सुरू असलेला विसर्ग कश्यपी - २५९२ क्युसेक, मुकणे - ९०० क्युसेक, वालदेवी - ५९९ क्युसेक, आळंदी - २४३ क्युसेक, भावली - २१५२ क्युसेक, भाम - ५५९९ क्युसेक, गौतमी गोदावरी - २३०० क्युसेक असा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
Maharashtra Dam : राज्यातील 11 मोठी धरणे काठोकाठ भरली, वाचा कुठल्या धरणांत किती पाणी?