Nashik Gangapur Dam : गंगापूर धरण (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची जोर कायम असून धरणातून विसर्ग सुरूच आहे. आज पुन्हा विसर्ग वाढविण्यात आला असून त्यामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.
गेल्या महिनाभरापासून नाशिक जिल्ह्यात (Nashik rain) पावसाची संततधार कायम असून धरणाची पाणीपातळी पन्नाशीपार पार झाली आहेत. तर काही निवडक धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. जिल्ह्यात महत्वपूर्ण असलेले गंगापूर धरणातून सातत्याने विसर्ग सुरु असून कालपर्यंत हा विसर्ग ४६५६ क्यूसेस इतका होता, तरी तो सकाळी १० वाजता ५३० क्यूसेस ने वाढ करून एकूण ५१८६ क्यूसेस करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील इतर धारणांमधूनही विसर्ग वाढविण्यात आला असून यामध्ये दारणा धरणातून ८५८० क्युसेक, नांदूरमध्यमश्वेर बंधाऱ्यातून २७९८० क्युसेक, पालखेड धरणातून ६४६ क्युसेक, भोजापूर धरणातून ७६ क्युसेक, भावली धरणातून ७०१ क्युसेक, भाम धरणातून ३५२२ क्युसेक, काश्यपी धरणातून ५०० क्युसेकने विसर्ग सुरु आहे.
गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच आहे, त्यामुळे धरणातून आवक वाढली आहे. परिणामी गंगापूर धरणाच्या विसर्गात वाढ केल्याने गोदावरीला पूर आला आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने अनेक छोटीमोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत.