Join us
Daily Top 2Weekly Top 5

Heatwave Alert : हीटवेव्ह की दिलासा? मे महिन्यात तापमानाचा 'अप-डाऊन' सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 12:06 IST

Heatwave Alert : एप्रिलच्या अखेरीस कडाक्याच्या उष्णतेने हैराण केलेल्या छत्रपती संभाजीनगरकरांना मेच्या सुरुवातीलाच थोडासा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. सोमवारी तापमान ३९.३ अंशांवर घसरले असले तरी पुढील काही दिवसांत पुन्हा ४३ अंशांचा टप्पा गाठण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तापमानाचा हा 'अप-डाऊन' नेमका कशामुळे? जाणून घ्या सविस्तर…(Heatwave Alert)

Heatwave Alert : एप्रिलच्या अखेरीस विक्रमी उष्णतेचा तडाखा बसल्यानंतर आता मे महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात चढ-उतार सुरू झाले आहेत. (Heatwave Alert)

सोमवारी (४ मे) शहरात कमाल तापमान ३९.३°C इतके नोंदले गेले, जे गेल्या चार वर्षांतील मे महिन्यातील सर्वात कमी तापमान ठरले आहे.(Heatwave Alert)

तापमानात अचानक घसरण

४ मे: ३९.३°C (मेमधील सर्वात कमी)

३ मे: ४०.४°C

२ मे: ४१.५°C

१ मे: ४०°C

किमान तापमान सोमवारी २३.५°C राहिले. सकाळी उन्हाची तीव्रता जाणवत असली तरी हवेत गारवा असल्याने तापमानात वाढ झाली नाही.

एप्रिलचा शेवटचा आठवडा 'सर्वांत हॉट'

२६ एप्रिलपासून शहरात तापमान सतत वाढ-घट होत असले तरी एप्रिलचा शेवटचा आठवडा सर्वाधिक उष्ण ठरला.

सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत उन्हाचा चटका कायम

सूर्यास्तानंतरही वातावरणातील उष्णता टिकून

पुढील अंदाज काय?

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मेच्या पहिल्या पंधरवड्यात तापमान अप-डाऊन राहणार

दुसऱ्या पंधरवड्यात पारा ४३°C च्या आसपास जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

धाराशिव जिल्ह्यात उष्णतेची लाट

मेच्या सुरुवातीलाच जिल्ह्यात उष्णतेचा तडाखा तीव्र झाला आहे. सोमवारी तापमान ४१.५°C वर पोहोचल्याने नागरिक हैराण झाले.

दुपारच्या उन्हाने नागरिक हैराण

सकाळी ९ पासूनच उन्हाची तीव्रता

दुपारी १२ ते ५ या वेळेत रस्ते ओस

अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळले जात आहे

अंगाला चटके देणारे उन्ह आणि वाढलेली उष्णता यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.

आरोग्यावर परिणाम

वाढत्या उष्णतेमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे.

चक्कर येणे

डिहायड्रेशन

डोकेदुखी

अशा तक्रारी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

थंड पेयांना वाढती मागणी

उन्हापासून बचावासाठी नागरिक शहाळे, लिंबू सरबत, ताक, कलिंगड यांकडे मोठ्या प्रमाणावर वळत आहेत. रसवंतीगृहे आणि फळांच्या गाड्यांवर गर्दी वाढली आहे.

पशु-पक्ष्यांवरही परिणाम

उष्णतेमुळे पाण्याची टंचाईचा पशु-पक्ष्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येत्या काळात ही परिस्थितीही गंभीर होत आहे.

बचावासाठी प्रशासनाचे आवाहन

तहान नसली तरी पुरेसे पाणी प्या

बाहेर पडताना टोपी/छत्री वापरा

सुती कपडे परिधान करा

कष्टाची कामे सकाळी/सायंकाळी करा

एप्रिलमध्ये उच्चांक गाठल्यानंतर मेमध्ये तापमानात चढ-उतार दिसत असला तरी उष्णतेचा तडाखा कायम आहे. पुढील काही दिवसांत तापमान आणखी वाढण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अत्यावश्यक आहे.

हे ही वाचा सविस्तर : Heatwave Alert : उष्णतेचा कहर वाढतोय; अन् सरकार म्हणते उष्णतेची लाट 'आपत्ती' नाही?

अधिक वाचा : Farmer Jugaad : असह्य उष्णता, करपणारी पिकं… आणि अचानक एक भन्नाट जुगाड वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Heatwave Alert: Temperature fluctuations bring relief, but heatwave persists.

Web Summary : Chhatrapati Sambhajinagar experiences fluctuating temperatures, offering slight relief after intense heat. While temperatures dipped, a rise back to 43°C is expected. Heatwave conditions persist in Dharashiv, prompting health warnings and increased demand for cooling refreshments. Citizens are advised to take precautions.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजशेतकरीशेती