नांदेड : मराठवाड्यातील दुष्काळाचे चक्र मोडण्यासाठी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने मोठे पाऊल उचलले आहे. (Godavari Irrigation Project)
नाशिक ते नांदेडपर्यंत विस्तारलेल्या या महामंडळाने नांदेड जिल्ह्यातील लोहा आणि कंधार तालुक्यांसाठी महत्त्वाकांक्षी उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली आहे.(Godavari Irrigation Project)
या योजनेमुळे सुमारे ७,५०० हेक्टर कोरडवाहू जमीन ओलिताखाली येणार असून शेतकऱ्यांच्या जीवनमानात मोठा बदल अपेक्षित आहे.(Godavari Irrigation Project)
'सुजलाम् सुफलाम्'कडे वाटचाल
मराठवाड्यासाठी शासनाने १९.२९ अब्ज घनफूट पाणी वापरास विशेष मंजुरी दिली आहे. यातील काही प्रमाणात पाणी आधीच विविध योजनांसाठी वितरित करण्यात आले असून, आता लोहा–कंधार तालुक्यांसाठी स्वतंत्र उपसा सिंचन योजना राबवण्याचे नियोजन सुरू आहे.
पावसाळ्यात गोदावरीनदीतून वाहून जाणारे अतिरिक्त पाणी वाया न घालवता ते उचलून दुष्काळी भागात पोहोचवण्यावर भर दिला जाणार आहे.
कसा होणार प्रकल्प?
गोदावरी नदीवरील बंधाऱ्यातील अतिरिक्त पाणी पंपहाऊसद्वारे उचलले जाणार
सुमारे ८५ किमी अंतरावर दुष्काळग्रस्त भागात पोहोचवले जाईल
पाणी लिंबोटी धरण किंवा नव्या तलावांमध्ये साठवले जाईल
लोहा आणि कंधार तालुक्यात सिंचनासाठी वितरित केले जाईल
शेतकऱ्यांना मोठा दिलासा
या प्रकल्पामुळे कोरडवाहू जमीन ओलिताखाली येईल
नगदी पिकांचे उत्पादन वाढेल
पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल
लोहा तालुक्यातील सिंचनाचा अनुशेष भरून निघण्यास या योजनेचा मोठा फायदा होणार आहे.
पाण्याचा अपव्यय रोखणार
दरवर्षी पावसाळ्यात गोदावरी नदीतून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते. या योजनेद्वारे सुमारे ५० दशलक्ष घनमीटर (दलघमी) पाणी साठवून उपयोगात आणले जाणार आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय रोखण्यास मदत होणार आहे.
कोट्यवधींचा प्रकल्प
हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येणार असून त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सध्या सर्वेक्षणाला वेग देण्यात आला असून शासकीय पातळीवर बैठका सुरू आहेत.
स्थानिक लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा आणि प्रशासनाची सकारात्मक भूमिका यामुळे प्रकल्प लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे.
हरित मराठवाड्याकडे पाऊल
प्रकल्प पूर्ण झाल्यास लोहा–कंधार तालुक्यांचा संपूर्ण परिसर हरित आणि समृद्ध होण्याची अपेक्षा आहे.
शेतकऱ्यांना बारमाही पाणी उपलब्ध झाल्यास उत्पादनात वाढ होऊन आर्थिक स्थितीतही सुधारणा होणार आहे.
गोदावरीच्या पाण्याचा योग्य वापर करून दुष्काळी भागाला दिलासा देणारी ही योजना मराठवाड्यासाठी गेमचेंजर ठरू शकते.
Web Summary : The Godavari Irrigation Project aims to transform the drought-prone regions of Loha and Kandhar in Marathwada. The project irrigates 7,500 hectares of land using surplus Godavari river water and promises increased agricultural production, improved drinking water access, and a boost to the rural economy.
Web Summary : गोदावरी सिंचाई परियोजना का लक्ष्य मराठवाड़ा के सूखाग्रस्त लोहा और कंधार क्षेत्रों को बदलना है। यह परियोजना गोदावरी नदी के अधिशेष जल का उपयोग करके 7,500 हेक्टेयर भूमि की सिंचाई करती है और कृषि उत्पादन में वृद्धि, पेयजल पहुंच में सुधार और ग्रामीण अर्थव्यवस्था को बढ़ावा देने का वादा करती है।