Join us

गिरणासह दारणा धरणही 100 टक्के भरले, गंगापूर धरणांत किती पाणी, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2025 13:29 IST

Gangapur Dam : २६ प्रकल्पांपैकी १४ धरणे १०० टक्के भरले असून इतर सर्व धरणे ९९ टक्के भरले आहेत.

Gangapur Dam :  नाशिक जिल्ह्यातील (Nashik Dam Storage) एकूण २६ प्रकल्पांपैकी १४ धरणे १०० टक्के भरले असून इतर सर्व धरणे ९९ टक्के भरले आहेत. आज १५ सप्टेंबर पर्यंत गंगापूर धरण ९८ टक्के भरले आहे. तर जळगाव जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे गिरणा धरण १०० टक्के भरले आहे. 

नाशिक जिल्ह्यातील गौतमी गोदावरी, कश्यपी, आळंदी, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, दारणा, वालदेवी, भाम, हरणबारी, केळझर, नागासाक्या, माणिकपुंज ही धरणे १०० टक्के भरली आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ९९.०८ टक्के जलसाठा जमा झाला आहे, जो मागील वर्षीपेक्षा ९ टक्क्यांनी अधिक आहे. 

धरण साठा स्थिती पाहुयात...

यामध्ये गंगापूर धरण ९८.२६ टक्के, पालखेड ९४.०३ टक्के, करंजवण ९९.२७ टक्के, पुणेगाव ९७.७५ टक्के, मुकणे ९८.०४ टक्के, कडवा ९८.८२ टक्के, नांदूर मध्यमेश्वर ९१.०५ टक्के, वाकी ९६.०७ टक्के, भोजापूर ९० टक्के, चणकापूर ९८.०६ टक्के,  पुनद ९८.२६ टक्के अशी धरणांची स्थिती आहे.

टॅग्स :गंगापूर धरणहवामान अंदाजपाऊसपाणी कपात