Join us
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूर धरण पाणीसाठा मार्चमध्येच 59 टक्क्यांवर, वाचा बाकी धरणांमध्ये किती पाणी शिल्लक? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 17:50 IST

Gangapur Dam : नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा ५९.११ टक्क्यांवर आला आहे.

नाशिक : शहरासह जिल्ह्यात उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्या असून जलसाठ्यांचे बाष्पीभवन वेगाने होऊ लागल्यामुळे पाणीटंचाईची समस्या भेडसावण्याची चिन्हे आता दिसू लागली आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणाचा जलसाठा ५९.११ टक्क्यांवर आला आहे.

पंधरवड्यात कमाल तापमान शहरात ३८.५ तर मालेगाव सारख्या ग्रामीण भागात ४० अंशापर्यंत पारा चढल्याची नोंद झाली आहे. यावरून उन्हाळ्याची तीव्रता यावरून लक्षात येते. गंगापूर धरणात ३,३२८ दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

मागीलवर्षी पंधरवड्यात गंगापूर धरणात ७२.४३ टक्के पाणीसाठा होता येत्या काही दिवसांत जिल्ह्याच्य ग्रामीण भागातून टँकरच्या मागणीत मोठी वाढ होऊ शकते.

जिल्ह्यातील काही धरणांचा साठा (टक्क्यांत)गंगापूर : ५९.११ टक्के, काश्यपी : ८४.१८ टक्के, गौतमी : ८६.०३ टक्के, आळंदी : ४८.६५ टक्के, पालखेड : ५७.८९ टक्के, करंजवण : ५७.८५ टक्के, वाघाड : ३८.१८ टक्के, ओझरखेड : ७०.४२ टक्के, दारणा : ५६.६५ टक्के, भावली : ५०.०७ टक्के, मुकणे : ६४.९७ टक्के, वालदेवी : ८१.२० टक्के, कडवा : ३६.७९ टक्के, चणकापूर : ५७.७७ टक्के, हरणबारी : ६२.२६ टक्के, केळझर : ६२.५९ टक्के. 

English
हिंदी सारांश
Web Title : Gangapur Dam Water Levels Dip to 59% in March: Report

Web Summary : Nashik faces potential water scarcity as Gangapur Dam's storage drops to 59.11% amid rising temperatures. Other dams in the district also show varying water levels, raising concerns about increased tanker demand in rural areas.
टॅग्स :गंगापूर धरणशेती क्षेत्रहवामान अंदाजनाशिकपाणी