Nashik Dam Storage : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने उघडीप दिली असून नाशिक जिल्ह्यातही दोन दिवसांपासून पावसाने हजेरी लावलेली नाही. आज १२ जुलैपर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण ६५.९२ पाणीसाठा जमा झाला आहे.
नाशिक जिल्ह्यातील २६ प्रकल्पांपैकी सात धरणे शंभर टक्के भरली असून यात आळंदी, पुणेगाव, वालदेवी, भावली, भाम, भोजापूर, हरणबारी, केळझर या धरणांचा समावेश आहे. महत्त्वाचं म्हणजे आळंदी धरण हे मागील वर्षी या दिवशी केवळ २.२१ टक्के होतं, तर केळझर धरण २.९७ होत. आज ही दोन्ही धरणे शंभर टक्के भरली आहेत.
तसेच नाशिक जिल्ह्यासाठी महत्त्वपूर्ण असलेले गंगापूर धरण आज ५५.४७ टक्क्यांवर असून इतर धरणांमध्ये कश्यपी ८० टक्के, पालखेड ६६ टक्के, दारणा ६२ टक्के, नांदूर मध्यमेश्वर ९१.५ टक्के, गिरणा ५०.७६ टक्के आहे.
नाशिक जिल्ह्यात एकूण २६ प्रकल्पापासून या मोठ्या प्रकल्पांची संख्या ०७ असून मध्यम प्रकल्पांची संख्या १९ आहे. तर मागील वर्षी या दिवशी धरणांमध्ये केवळ १३.४८ टक्के इतका साठा होता तर आज तो साठा ६५.९२ टक्क्यांवर आहे.
हेही वाचा : जायकवाडी, गंगापूर, उजनी, कोयना 'ही' धरणे किती टक्क्यांवर आली, वाचा राज्याचा पाणीसाठा