Join us
Daily Top 2Weekly Top 5

Floating Solar Power Project : धरणांवर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प; मराठवाड्यात ऊर्जा निर्मितीचा नवा अध्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 16:17 IST

Floating Solar Power Project : जायकवाडीसह मराठवाड्यातील अनेक धरणांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. या प्रकल्पांमुळे हरित ऊर्जा वाढणार असून, स्थानिक पातळीवर वीज उपलब्धता सुधारण्याची शक्यता आहे.(Floating Solar Power Project)

बापू सोळुंके

मराठवाड्यातील धरणांचा वापर करून ऊर्जा निर्मिती वाढविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. (Floating Solar Power Project)

गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत पाच धरणांवर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यासाठी सल्लागार एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे.(Floating Solar Power Project) 

या प्रकल्पांमुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होण्याबरोबरच हरित ऊर्जेचा वापरही वाढणार आहे.

महामंडळाला स्वायत्त करण्याचा निर्णय राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतल्यानंतर उत्पन्नाचे स्वतंत्र स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार सौरऊर्जा आणि जलविद्युत प्रकल्पांच्या माध्यमातून आर्थिक बळकटी देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

पाच धरणांवर सौर प्रकल्पाची योजना

मराठवाड्यातील अप्पर पेनगंगा, पूर्णा, सिंदफणा तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मुळा या धरणांवर तरंगते सौरऊर्जा प्रकल्प उभारले जाणार आहेत.

या प्रकल्पासाठी नियुक्त सल्लागार एजन्सी सविस्तर अहवाल तयार करणार असून, त्यामध्ये खर्च, तांत्रिक बाबी आणि संभाव्य उत्पन्नाचा अंदाज दिला जाणार आहे. अहवालानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

जायकवाडीवर मोठा प्रकल्प; एनटीपीसीचा सहभाग

जायकवाडी धरण येथे आधीच एनटीपीसी लिमिटेड(NTPC Limited) यांच्या माध्यमातून सुमारे २००० मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प साकारला जात आहे. यासाठी केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. याचबरोबर महामंडळाकडून स्वतंत्र प्रकल्प उभारण्याचाही विचार सुरू आहे.

बंद जलविद्युत प्रकल्पाला नवसंजीवनी

जायकवाडी धरणावरील जलविद्युत प्रकल्प गेल्या काही वर्षांपासून तांत्रिक कारणांमुळे बंद आहे. हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले असून, तो कार्यान्वित झाल्यास पैठण शहर व परिसरातील वीज समस्या मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

उत्पन्नवाढीसोबत हरित ऊर्जेला चालना

सौरऊर्जा प्रकल्पांमुळे महामंडळाला अतिरिक्त उत्पन्न मिळणार असून, पारंपरिक ऊर्जेवरील अवलंबित्व कमी होईल. तसेच पर्यावरणपूरक ऊर्जा निर्मितीला चालना मिळणार आहे.

पर्यावरणीय चिंता देखील समोर

काही पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकल्पांबाबत चिंता व्यक्त केली आहे. धरणांवरील सौर पॅनल्समुळे जलस्रोतांतील जैवविविधता, मासेमारी आणि स्थलांतरित पक्ष्यांवर परिणाम होऊ शकतो, असे मत मांडले जात आहे. त्यामुळे प्रकल्प राबविताना पर्यावरणीय परिणामांचा सखोल अभ्यास करण्याची गरज व्यक्त होत आहे.

निर्णायक टप्प्याकडे वाटचाल

सल्लागार एजन्सीचा अहवाल आल्यानंतर प्रकल्पाच्या अंमलबजावणीला गती मिळणार आहे. मराठवाड्यातील धरणांचा वापर करून ऊर्जा निर्मिती वाढवण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प भविष्यात प्रदेशाच्या विकासाला नवी दिशा देऊ शकतो.

हे ही वाचा सविस्तर :Manjara River Water Release : मांजरा काठचा शेतकरी सुखावला; उसाला मिळणार मोठं 'जीवनदान' वाचा सविस्तर

अधिक वाचा : Jayakwadi Canal Water Release : शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर; जायकवाडीमधून ४ आवर्तने; पाण्याची चिंता संपली?

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada to Harness Solar Power with Floating Projects on Dams

Web Summary : Marathwada plans floating solar projects on five dams, boosting green energy and revenue. A consultant will assess feasibility. A 2000 MW NTPC project is already planned for Jayakwadi dam. The initiative aims to revive a closed hydroelectric project and promote eco-friendly energy alternatives.
टॅग्स :शेती क्षेत्रजायकवाडी धरणधरणपाणीशेतकरीशेती