Join us

राज्यातील 'ही' तीन धरण 100 टक्के भरली, वाचा जिल्हा निहाय धरण पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2025 12:14 IST

Maharashtra Dam Storage :  राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार कायम असून धरण साठ्यात देखील कमालीची वाढ झाली आहे.

Maharashtra Dam Storage :  राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची संततधार कायम असून धरण साठ्यात देखील कमालीची वाढ झाली आहे. केवळ नागपूरसह मराठवाड्यातील बहुतांश जिल्ह्यांना जोरदार पावसाची प्रतिक्षा आहे. आजमितीस म्हणजेच ५ जुलै पर्यंत धरणातील पाणीसाठा किती आहे हे पाहुयात..

अहमदनगर जिल्ह्याचा विचार करता या जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठा मुबलक प्रमाणात वाढला आहे. यातील आढळा, भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाले असून सीना धरण १०० टक्के झाले आहे. भंडारदरा धरण ६८ टक्के, निळवंडे धरण ६१ टक्के इतके भरले आहे. 

नाशिक विभागातील गंगापूर धरण ५८.८६ टक्के, दारणा धरण ५८ टक्के, पालखेड धरण ५३ टक्के, गिरणा धरण ३९ टक्के, हतनूर धरण २८ टक्के तर पांझरा धरण 81 टक्क्यांवर आहे. 

तसेच मुंबईसह कोकणातील धरणांचा विचार केला तर मोडक सागर धरण ६७.५० टक्के, तानसा धरण ५३.८२ टक्के, भातसा धरण ५८.४५ टक्के, तिलारी धरण ८४.७५ टक्के, अर्जुना धरण ९७.१२ टक्के, गडनदी ८१.६७ टक्के असा जलसाठा जमा झाला आहे. पुणे विभागातील चासकमान ६८.९२ टक्के, पानशेत ५९.३९ टक्के, खडकवासला ५८.८८ टक्के, वीर धरण ७५.८५ टक्के, मुळशी धरण ६९.३० टक्के भरले आहे. 

तसेच उजनी धरण ९०.३९ टक्के त्यापैकी उपयुक्त जलसाठा ७९ टक्के कोयना धरण ६०६९ टक्के त्यापैकी उपयुक्त जलसाठा ५८.६७ टक्के, जायकवाडी धरण ६१.१६ टक्के त्यापैकी उपयुक्त जलसाठा ४७.९६ टक्के, पेनगंगा धरण ५३.१५ टक्के...

नागपूर विभागातील गोसीखुर्द २७.३३ टक्के, खडकपूर्णा धरण ०३.०३ टक्के, काटेपूर्णा धरण २१.६९ टक्के, उर्ध्व वर्धा ४२.६८ टक्के असाधारण साठा जमा झाला आहे.

- इंजि. हरिश्चंद्र र. चकोर, जलसंपदा (से.नि) संगमनेर.

टॅग्स :जायकवाडी धरणगंगापूर धरणउजनी धरणपाऊसहवामान अंदाज