Cold Wave Alert : देशात हिवाळ्याने जोरदार हजेरी लावली असून उत्तर भारतात तापमानात मोठी घसरण झाली आहे. (Cold Wave Alert)
जम्मू-कश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशसारख्या पर्वतीय राज्यांत प्रचंड थंडी, बर्फवृष्टीचे अंदाज, तर काही ठिकाणी जलस्त्रोतही गोठण्यास सुरुवात झाल्याचे चित्र दिसत आहे. उत्तर भारतातील तीव्र थंडीचा परिणाम आता महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे.(Cold Wave Alert)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही भागांत थंडीची लाट (Cold Wave) ते तीव्र थंडीची लाट (Severe Cold Wave) येण्याचा इशारा जारी केला आहे.(Cold Wave Alert)
उत्तर भारतातील तीव्र थंडीचा प्रभाव
देशाच्या उत्तरेकडील आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये तापमान झपाट्याने खाली येत असून अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी पडत आहे. तिथे सुरू झालेली बर्फवृष्टी, गार वारे आणि गोठणारे जलस्त्रोत यामुळे तापमानात थेट घसरण होत आहे.
या थंडीच्या लाटेचा प्रभाव महाराष्ट्रातही जाणवू लागला आहे, विशेषत: मध्य महाराष्ट्रात याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे.
महाराष्ट्रातील हवामान स्थिती काय?
हवामान विभागाने पुढील २४ ते ४८ तासांत खालील भागांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा दिला आहे:
जळगाव, धुळे, नाशिक, निफाड या भागांमध्ये तापमान किमान पातळीवर पोहोचण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मुंबईसुद्धा गारठली!
देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही थंडीने जोर धरला आहे.
मंगळवारी पहाटे आणि रात्रीच्या वेळी तापमानात जाणवण्याजोगी घट नोंदवली गेली.
किमान तापमान : १८–२०°C
पुढील एक ते दोन दिवस मुंबईत थंडी कायम राहणार असल्याचा अंदाज दिला आहे.
राज्यातील प्रमुख शहरांतील तापमान (कमाल/किमान अंश सेल्सिअस):
| शहर | कमाल तापमान | किमान तापमान |
|---|---|---|
| पुणे | २८.०° | ९.४° |
| धुळे | २८.०° | ६.२° |
| कोल्हापूर | २८.६° | १४.६° |
| महाबळेश्वर | २४.८° | १०.०° |
| नाशिक | २७.२° | ९.२° |
| सोलापूर | ३०.६° | १३.९° |
| रत्नागिरी | ३३.२° | १८.१° |
| मुंबई (सांताक्रूझ) | ३२.३° | १७.४° |
धुळे आणि निफाडसारख्या भागांत ६.२°C पर्यंत घसरलेलं तापमान चिंताजनक पातळीवर असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
आरोग्याची काळजी घ्या!
* सकाळ-संध्याकाळ उबदार कपडे वापरा.
* लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी.
* तापमानातील अचानक बदलामुळे सर्दी, खोकला वाढू शकतो
* गरम पाणी आणि पौष्टिक आहार सेवन करावा
* थंडीच्या या लाटेमुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* फुलोरा व फळधारणेच्या टप्प्यावर असलेल्या पिकांवर थंडीचा जास्त परिणाम होतो.
* पिकांवर शेतसिंचन केल्यास तापमान २–३°C ने वाढते आणि थंडीचा परिणाम कमी होतो.
* ड्रिपद्वारे हलके पाणी सोडा असा सल्ला देण्यात आला आहे.
