Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Basmati Rice Market : बासमती तांदळाचा भाव का वाढला? जाणून घ्या काय आहे कारण

Basmati Rice Market : बासमती तांदळाचा भाव का वाढला? जाणून घ्या काय आहे कारण

latest news Basmati Rice Market: Why has the price of basmati rice increased? Know what is the reason | Basmati Rice Market : बासमती तांदळाचा भाव का वाढला? जाणून घ्या काय आहे कारण

Basmati Rice Market : बासमती तांदळाचा भाव का वाढला? जाणून घ्या काय आहे कारण

Basmati Rice Market : इराणमधील युद्धजन्य स्थितीमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीला फटका बसला असताना, देशांतर्गत बाजारात मात्र बासमतीचे भाव थेट २० रुपयांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले तरी मिलवाल्यांनी दरवाढ कायम ठेवल्याने तांदूळ बाजारात उलट चित्र पाहायला मिळत आहे.

Basmati Rice Market : इराणमधील युद्धजन्य स्थितीमुळे बासमती तांदळाच्या निर्यातीला फटका बसला असताना, देशांतर्गत बाजारात मात्र बासमतीचे भाव थेट २० रुपयांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले तरी मिलवाल्यांनी दरवाढ कायम ठेवल्याने तांदूळ बाजारात उलट चित्र पाहायला मिळत आहे.

Basmati Rice Market : भारतीय बासमती तांदळाचा सर्वात मोठा खरेदीदार देश असलेल्या इराणमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

या अस्थिरतेचा थेट परिणाम भारताच्या बासमती तांदळाच्या निर्यातीवर झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारात बासमतीचे दर प्रतिकिलो ५ ते १० रुपयांनी घसरले आहेत.

मात्र, या घसरणीचा फायदा स्थानिक बाजारपेठेला मिळण्याऐवजी मिलवाल्यांनी उलट प्रतिकिलो तब्बल २० रुपयांपर्यंत दरवाढ केल्याने व्यापारीवर्गात संभ्रम निर्माण झाला आहे.

निर्यात मंदावलेली असताना देशांतर्गत बाजारात दर वाढणे ही उलटी चाल असल्याचे मत तांदूळ व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

इराणमधील आयातदार सध्या देयके वेळेत पूर्ण करण्यात असमर्थता दर्शवीत असल्याने भारतीय निर्यातदारांचे मोठे निधी अडकले असून नव्या करारांमध्ये विलंब होत आहे. परिणामी, निर्यातीचे संपूर्ण गणितच बिघडल्याचे चित्र आहे.

इराणचा मोठा वाटा, निर्यातीवर थेट परिणाम

इंडियन राईस एक्सपोर्टर्स फेडरेशन (IREF) च्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारताने इराणला सुमारे ५.९९ लाख टन बासमती तांदूळ निर्यात केला आहे.

इराण हा भारतीय बासमतीचा सर्वात मोठा आयातदार देश असल्याने तेथील युद्धजन्य परिस्थितीचा थेट फटका भारतीय निर्यातीला बसला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये दररोज ४० टन विक्री

तांदूळ व्यापाऱ्यांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रात प्रामुख्याने हरियाणा आणि पंजाब येथून बासमती तांदूळ येतो.

एकट्या छत्रपती संभाजीनगर शहरात दररोज सुमारे ४० टन बासमती तांदळाची विक्री होते. यामध्ये अस्सल बासमतीचा वाटा केवळ ५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

१५ दिवसांत बासमतीच्या दरात मोठी उसळी

बासमती वाण१ जानेवारी (₹/किलो)१९ जानेवारी (₹/किलो)
१५०९ बासमती६८ ते ७०७५ ते ८५
१४०१ बासमती६८ ते ७२७५ ते ८०
११२१ बासमती९५ ते १०५११० ते १२०
ओरिजिनल बासमती१४० ते १५०१५० ते १७०

आंतरराष्ट्रीय बाजारात दर कमी होत असतानाही स्थानिक बाजारात मिलवाल्यांनी बासमतीचे भाव प्रतिकिलो ५ ते १० रुपयांनी वाढवून विक्री सुरू ठेवली आहे. काही प्रकारांमध्ये ही वाढ थेट २० रुपयांपर्यंत पोहोचली आहे.

दरवाढ टिकणार नाही

आंतरराष्ट्रीय बाजारात बासमतीचे दर घसरत असताना देशांतर्गत बाजारात दरवाढ होणे अयोग्य आहे. निर्यातीची सध्याची परिस्थिती पाहता ही दरवाढ फार काळ टिकणारी नाही.- निर्भय देवडा, व्यापारी

अमेरिकेच्या शुल्कवाढीचा मर्यादित परिणाम

दरम्यान, अमेरिकेने भारतीय तांदळावरील आयात शुल्क १० टक्क्यांवरून ५० टक्के करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. 

हा प्रस्ताव अमलात आल्यास अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.

मात्र, एप्रिल ते नोव्हेंबर या कालावधीत भारताने अमेरिकेला २ लाख ४० हजार ५१८ टन बासमती तांदूळ निर्यात केला आहे.

बासमती खरेदी करणाऱ्या देशांमध्ये अमेरिका चौथ्या क्रमांकावर असल्याने शुल्कवाढीचा परिणाम मर्यादित राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

इराणमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरले असताना स्थानिक बाजारात बासमती तांदळाची दरवाढ झाल्याने ग्राहक आणि व्यापारी दोघेही अडचणीत आले आहेत.

निर्यातीची स्थिती सुधारल्याशिवाय किंवा साठेबाजीवर नियंत्रण न आणल्यास येत्या काळात बासमतीच्या किमतींबाबत अधिक अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शेतकऱ्यांवर काय होईल परिणाम?

* शेतकऱ्यांकडील खरेदी कमी होण्याची शक्यता

* शेतमालाचे दर अचानक कोसळण्याची शक्यता

हे ही वाचा सविस्तर :Melghati Buffalo : विदर्भाच्या पशुधनाला ऐतिहासिक ओळख; मेळघाटी म्हशीला मिळाले राष्ट्रीय मानांकन वाचा सविस्तर

Web Title : महाराष्ट्र मौसम अपडेट: नवीनतम पूर्वानुमान और मुख्य घटनाक्रम संक्षेप में

Web Summary : महाराष्ट्र मौसम अपडेट: नवीनतम पूर्वानुमान प्राप्त करें। राज्य भर में मौसम के पैटर्न को आकार देने वाले मुख्य घटनाक्रमों के बारे में सूचित रहें। एक संक्षिप्त अवलोकन सुनिश्चित करता है कि आप किसी भी बदलाव के लिए तैयार हैं।

Web Title : Maharashtra Weather Update: Latest Forecast and Key Developments in Brief

Web Summary : Maharashtra weather update: Get the latest forecast. Stay informed about the key developments shaping the weather patterns across the state. A brief overview ensures you're prepared for any changes.