नीलेश साळुंखेकोयनानगर: महाराष्ट्राची भाग्यरेषा असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलसागर तथा कोयना जलविद्युत प्रकल्पाने पुन्हा एकदा इतिहास घडविला आहे.
धरणाच्या पायथा वीजगृह प्रकल्पाच्या स्थापनेपासून आर्थिक वर्षात सर्वाधिक वीजनिर्मितीचा विक्रम नोंदवत ऊर्जा क्षेत्रात नवा मैलाचा दगड उभा केला आहे. या वर्षात प्रकल्पाने तब्बल १९५.६५२ दशलक्ष युनिट्सचा टप्पा पार करत उच्चांक प्रस्थापित केला आहे.
१९८० मध्ये उभारण्यात आलेल्या या प्रकल्पाने दि. ३ मार्च रोजी दुपारी १:२० वाजता आर्थिक वर्ष २०१८-१९ मधील १९५.६५२ दशलक्ष युनिट्स (एमयू) या आधीच्या विक्रमाला मागे टाकले. त्यामुळे पायथा वीजगृह प्रकल्पाच्या कार्यकाळातील हा सर्वोच्च विक्रम ठरला आहे.
उपलब्ध पाणीसाठा, योग्य जलव्यवस्थापन, तांत्रिक कार्यक्षमता आणि काटेकोर नियंत्रण यांचा समतोल राखत 'फ्लोविंग वॉटर, फ्लोविंग एनर्जी' ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्यात यश आले आहे.
पायथा वीजगृहाच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कोयना प्रकल्पाच्या यशोगाथेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, ऊर्जा क्षेत्रात कोयनेचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे.
या ऐतिहासिक विक्रमामागे कोयना सिंचन व पायथा वीजग्रह प्रकल्प, महानिर्मितीचे अभियंते, अधिकारी आणि तांत्रिक कर्मचाऱ्यांचे नियोजनबद्ध कार्य मोलाचे ठरले आहे.
१९५६ मेगावॅट वीजनिर्मिती◼️ दि. १६ मे १९६० रोजी सुरू झालेला कोयना जलविद्युत प्रकल्प राज्याच्या ऊर्जा निर्मितीचा कणा मानला जातो.◼️ या प्रकल्पामध्ये पश्चिमेकडे एकूण १९२० व पूर्वेकडे पायथा वीजगृहातील दोन जनित्रांद्वारे सुमारे ३६ मेगावॅट निर्मिती होते.◼️ एकूण १,९५६ मेगावॅट वीजनिर्मिती या प्रकल्पातून होत आहे.
वीज व सिंचनासाठी वापरधरणाच्या डाव्या तीरावरील नियोजित वीजप्रकल्प सुरू होणार असून यामुळे सुमारे ८० मेगावॉट अतिरिक्त वीजनिर्मितीत वाढ होणार आहे.
७३.८० टीएमसी पाणीसाठा उपलब्ध◼️ या वीजगृहाची दोन्ही युनिट्स सुरळीत सुरू असून १०५.२५ टीएमसी पाणीसाठा क्षमतेच्या कोयना धरणात सध्या ७३.८० टीएमसी इतका पाणीसाठा उपलब्ध आहे.◼️ १ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीतील आर्थिक वर्ष संपण्यासाठी अजून २८ दिवस शिल्लक असल्याने आर्थिक वर्षाच्या अखेरीस वीजनिर्मितीचा नवा उच्चांक नोंदविला.
अधिक वाचा: मनाप्रमाणे जास्त क्षमतेचा सोलार प्रकल्प बसविण्याचा मार्ग झाला बंद; आता 'हा' नवा नियम लागू
Web Summary : The Koyna Hydroelectric Project, a lifeline for Maharashtra, has set a new record for power generation since its inception, producing 195.652 million units this financial year. This achievement underscores the project's efficiency and importance in the state's energy sector. Optimal water management and technical expertise contributed to this success.
Web Summary : महाराष्ट्र की जीवन रेखा, कोयना जलविद्युत परियोजना ने अपनी स्थापना के बाद से रिकॉर्ड बिजली उत्पादन किया है, इस वित्तीय वर्ष में 195.652 मिलियन यूनिट का उत्पादन किया है। यह उपलब्धि परियोजना की दक्षता और राज्य के ऊर्जा क्षेत्र में इसके महत्व को रेखांकित करती है। इष्टतम जल प्रबंधन और तकनीकी विशेषज्ञता ने इस सफलता में योगदान दिया।