कोयना धरण पाणलोट क्षेत्राला शुक्रवारी (दि. १५) दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तिव्रता २.९ नोंदविली गेली. यामुळे घराचे पत्रे हादरल्याने ग्रामस्थांनी घरातून बाहेर पडणे पसंत केले. मात्र यामुळे कोठेही नुकसान झाले नाही हेही विशेष.
कोयना धरण परिसरात शुक्रवारी दुपारी १ वाजून ३९ मिनिटांनी भूकंपाचा धक्का जाणवला. त्याचा केंद्रबिंदू कोयना धरणपासून चाळीस किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यात तानमळा गावाच्या पूर्वेला दहा किलोमीटर अंतरावर भूगर्भात ४१ किलोमीटर खोल होता. हे ठिकाण चिपळूणच्या दक्षिणेस अकरा किलोमीटरवर होता. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर २.९ नोंदविली गेली. यामुळे कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने परिस्थितीवर लक्ष ठेवून तात्काळ तपासणी केली असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन केले आहे. तसेच अशा नैसर्गिक घटनांसाठी यंत्रणा सतर्क ठेवण्यात आली असल्याचेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.