Join us

High Tide Alert समुद्रात जाऊ नका, पाच दिवस मोठी भरती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 10:11 IST

जूनच्या पहिल्याआठवड्यापासून समुद्रात मोठी भरती येणार असून साडेचार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत.

मुंबई : जूनच्या पहिल्याआठवड्यापासून समुद्रात मोठी भरती येणार असून साडेचार मीटर उंचीच्या लाटा High Tide उसळणार आहेत.

५ ते ८ जूनदरम्यान दररोज समुद्रात मोठी भरती येणार आहे. पावसाळ्यातील चार महिन्यांत एकूण २२ दिवस समुद्राला मोठी भरती येणार आहे.

सगळ्यात मोठी भरती २० सप्टेंबर रोजी येणार असून यावेळी ४.८० मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. पालिकेने येत्या पावसाळ्यासाठी भरती-ओहोटीचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

जूनच्या पहिल्या आठवड्यात सलग चार दिवस मोठी भरती येणार आहे. चारही बाजूने समुद्राने वेढलेल्या मुंबईला पावसाळ्यात मोठ्या भरतीचा धोका असतो.

तसेच मच्छिमारांना ही खोल समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.

या दिवशी मोठी भरती

तारीखवेळलाटांची उंची
७ जूनदुपारी १२:५०४.६७ मीटर
८ जूनदुपारी १:३४४.५८ मीटर
२३ जूनदुपारी १:०९४.५१ मीटर
२४ जूनदुपारी १:५३४.५४ मीटर
२५ जूनदुपारी २:३६४.५३ मीटर

अधिक वाचा: Rain Maharashtra Update मान्सून महाराष्ट्रात दाखल; पुढील चार आठवड्यांत कसा बरसणार पाऊस?

टॅग्स :हवामानहाय अलर्टपाऊसपाणीमच्छीमारमुंबई