Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > आज पाच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

आज पाच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

Heavy rain likely to occur in five districts today, Met department forecast | आज पाच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

आज पाच जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

जोरदार पावसाचा यलो अलर्ट

जोरदार पावसाचा यलो अलर्ट

राज्यातून पाऊस परतला असला तरी आज राज्यातील पाच जिल्ह्यांना मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला असून धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांना जोरदार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित राज्यात तापमानात काही अंशांची घट झाली असून काही मराठवाड्यात काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पश्चिमी वाऱ्यांच्या अडथळ्यामुळे तसेच लक्षद्वीप व त्याला जोडून असलेल्या असबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. परिणामी, अरबी समुद्रात आर्दता निर्माण झाली असून मध्य महाराष्ट्र व कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. 

कोकणातील काही ठिकाणी उद्याही (17) मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तसेच आकाश ढगाळ राहणार असून उत्तर व मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागाचे के. एस होसाळीकर यांनी ट्विट केले आहे. 
 

Web Title: Heavy rain likely to occur in five districts today, Met department forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.