Join us
Daily Top 2Weekly Top 5

शिवना टाकळीच्या उजव्या कालव्यातून सोडले पहिले आवर्तन; ४५०० हेक्टर जमीन येणार ओलिताखाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 11:41 IST

रब्बी हंगामातील पिकांसाठी शिवना टाकळी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार रविवारी (दि. ८) दुपारी उजव्या कालव्यातून पहिले आवर्तन सोडण्यात आले.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या कन्नड तालुक्यातील शिवना टाकळी धरण शंभर टक्के भरून ओव्हर फ्लो झाले होते. मात्र, अद्याप शेतीसाठी धरणातून पाणी सोडण्यात आले नव्हते. रब्बी हंगामातील पिकांसाठी कालव्यात पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. त्यानुसार रविवारी (दि. ८) दुपारी उजव्या कालव्यातून पहिले आवर्तन सोडण्यात आले.

वैजापूर तालुक्यातील बोरसर, खिर्डी, मनूर, साळेगाव, भोकरगाव, मालेगाव क., पोखरी, वाघला, शिवगाव, बाभूळगाव, पाथरी, भायगाव, धोंदलगाव या गावांसह तीस ते चाळीस गावांतील शेतकऱ्यांनी शिवना टाकळी धरणाच्या भरवशावर रब्बी हंगामातील पिके घेतली आहेत.

पण फेब्रुवारी महिन्याचा पहिला आठवडा संपला तरी पाणी सोडले नव्हते. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत होती. त्यानुसार रविवारी (दि.०८) फेब्रुवारी रोजी अखेर उजव्या कालव्यातून पहिले आवर्तन सोडण्यात आल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

४ हजार ५०० हेक्टर शेती ओलिताखाली

शिवना टाकळी धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणी सोडल्याने ४५०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार असून, यापैकी तीन ते साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रात गहू, हरबरा, कांदा, मका, ज्वारी, बाजरी, अद्रक, ऊस आदी पिकांची लागवड केली आहे. आतापर्यंत पिकांना विहिरींचे पाणी दिले जात होते. मात्र, आता विहिरींनी तळ गाठल्याने शेतकरी चिंतातुर झाले होते.

हेही वाचा : परिस्थितीशी झुंज देत विजयालक्ष्मी यांची दुग्धव्यवसायात भरारी; आता महिन्याकाठी १ लाख रुपयांची कमाई

English
हिंदी सारांश
Web Title : Shivna Takli Canal Releases Water; 4500 Hectares Irrigated

Web Summary : Shivna Takli dam released water into its right canal after farmer requests. This will irrigate 4500 hectares of land in Vaijapur, benefiting numerous villages dependent on the dam for rabi crops like wheat, and onions. Farmers expressed relief after facing water scarcity.
टॅग्स :छत्रपती संभाजीनगरपाणीपीकशेती क्षेत्रशेतीशेतकरी