गेल्या आठवड्यात थंडीने पाठ फिरवली होती. मात्र, उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे मंगळवारपासून पुन्हा गार वारे वाहू लागले असून, थंडीचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बुधवारीही दिवसभर वाऱ्यामुळे गारवा जाणवत होता. सायंकाळपासून थंडीची चाहूल लागली. रात्रीही थंडीचा जोर वाढला. त्यामुळे काही दिवस गारठा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यात असलेला थंडीचा कडाका कमी झाला होता. त्यामुळे आता थंडी हळूहळू गायब होण्याची शक्यता वाटत होती. तापमानात वाढ होत असतानाच पुन्हा थंडीचे 'कमबॅक' होऊ लागले आहे.
महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडू लागली असून, जानेवारी २०२६ च्या सुरुवातीला अनेक भागांत तापमानात लक्षणीय घट झाली आहे.
नाशिक, धुळे आणि उत्तर महाराष्ट्रात गारठा वाढला असून, कोल्हापूर, पुणे, मुंबई आणि कोकण किनारपट्टीवरही पहाटे धुके व हुडहुडी भरवणारी थंडी जाणवत आहे.
मंगळवारी सायंकाळपासून गार वारे वाहू लागले. रात्रीही थंडी जाणवत होती. बुधवारी दिवसाही गार वारे वाहू लागल्याने उन्हाचा कडाका कमी वाटत होता. सायंकाळीही हवेत गारवा होता.
सध्या कमाल आणि किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअस इतकी घट झाली आहे. बुधवारी कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान १९ अंश सेल्सिअस इतके होते.
महाराष्ट्रात उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडू लागल्याने यापुढे आठवडाभर कमाल आणि किमान तापमानात घट राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
फेब्रुवारी महिन्यापर्यंत थंडीचा मुक्काम ग्रामीण भागात राहणार असल्याचा अंदाज जाणकारांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
अधिक वाचा: जागतिक घडामोडींमुळे खाद्यतेलांच्या दरात वाढ; वाचा कोणत्या तेलाला किती मिळतोय दर?
Web Summary : After a brief respite, Maharashtra experiences a cold wave due to northern winds. Nashik, Pune, and Mumbai feel the chill. Temperatures have dropped by 2-3 degrees Celsius, and the India Meteorological Department forecasts continued cold weather for the next week, potentially lasting until February in rural areas.
Web Summary : महाराष्ट्र में उत्तरी हवाओं के कारण ठंड का प्रकोप फिर से शुरू हो गया है। नासिक, पुणे और मुंबई में ठंड महसूस हो रही है। तापमान में 2-3 डिग्री सेल्सियस की गिरावट आई है, और मौसम विभाग ने अगले सप्ताह तक ठंड जारी रहने का अनुमान जताया है, जो ग्रामीण क्षेत्रों में फरवरी तक रह सकती है।