lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > दुर्मीळ एशियन पॅराडाइजचे दैठणा परिसरात दर्शन !

दुर्मीळ एशियन पॅराडाइजचे दैठणा परिसरात दर्शन !

Darshan of a rare Asian paradise in Daithana area! | दुर्मीळ एशियन पॅराडाइजचे दैठणा परिसरात दर्शन !

दुर्मीळ एशियन पॅराडाइजचे दैठणा परिसरात दर्शन !

स्वर्गीय नर्तक, दूधराज, चंचल या नावाने प्रसिद्ध; मध्यप्रदेशाचा आहे राज्यपक्षी

स्वर्गीय नर्तक, दूधराज, चंचल या नावाने प्रसिद्ध; मध्यप्रदेशाचा आहे राज्यपक्षी

शेअर :

Join us
Join usNext

घनदाट वनात आढळणारा दुर्मीळ स्वर्गीय नर्तक, दूधराज, चंचल या नावाने प्रसिद्ध असलेला अन् मध्यप्रदेशचा राज्यपक्षी एशियन पॅराडाइजचे परभणी तालुक्यातील दैठणा परिसरामध्ये दर्शन झाले. यामुळे पक्षीप्रेमींकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहेत.

काळे डोके, पांढरेशुभ्र अंग अन् लांबसडक शेपटी अतिशय चंचल असलेला पक्षी शेतकरी रामकिशन कच्छवे यांना दैठणा शिवारात आंब्याच्या झाडावर दिसून आला. त्यांनी कुतूहलाने मोबाइलमध्ये फोटो घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय चंचल असल्याने एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर जात होता. कुतूहल म्हणून कच्छवे यांनी या पक्षाचे फोटो इंटरनेटवर सर्च केले असता हा पक्षी एशियन पॅराडाईज असल्याचे समोर आले. याबाबत अधिक माहिती घेतली असता हा पक्षी अतिशय दुर्मीळ असून मध्यप्रदेशचा राज्यपक्षी असल्याचे समजले, तसेच या पक्षासाठी मध्यप्रदेशात वनक्षेत्रदेखील राखीव ठेवण्यात आल्याचेही समजले. दरम्यान, हा पक्षाचे फोटो समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहेत.

यापक्षासोबत आणखी एशियन पॅराडाइज आहेत का, यावर परिसरातील पक्षीमित्र घेताना दिसत आहेत.दरम्यान, अधिक माहिती नसल्याने कच्छवे यांनी डॉ. रामेश्वर नाईक यांना विचारले असता हा पक्षी दुर्मीळ पक्षी असून, आपल्याकडे क्वचितच आढळत असल्याचे सांगितले.

वजन ३०-४० ग्राम अन् शेपटी ३० इंच

स्वर्गीय नर्तक, एशियन पॅराडाइज नावाने ओळखला आतो हुन जन्मभर एका जोडीसबित राहतो याचे जान ३० ते ४० ग्रॅम असते. शेपटी ३० इंचापर्यंत लांब असते. हा पक्षी नृत्य करताना मनमोहक दिसतो. नराचे डोके २ काळे, तर पूर्ण शरीर पांढरे असते, मादी तर ही तपकिरी रंगाची असते. 

वनक्षेत्र ठेवले राखीव

एशियन पॅराडाइज हा मुख्यतः हा पक्षी मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, गुजरात राज्यात आढळतो. दुर्मीळ असलेल्या मध्यप्रदेशमध्ये एशियन पॅराडाइज या पक्ष्यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

Web Title: Darshan of a rare Asian paradise in Daithana area!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.