मुंबई : गुजरातमध्ये कोसळणारा परतीचा पाऊस ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान मुंबईसह राज्यभरात पुन्हा बरसेल. ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसतील. तर १२ ऑक्टोबरनंतर मान्सून एक्झिट घेईल, असा अंदाज आहे.
ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांच्या म्हणण्यानुसार, हवामान विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, मध्य भारत व महाराष्ट्राच्या काही भागात दुसऱ्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे.
चक्रीवादळ 'शक्ती'◼️ गेल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात दाखल झाले. त्यामुळे मुंबईत पाऊस पडला.◼️ हे क्षेत्र अरबी समुद्रात दाखल झाल्यानंतर त्याचे रूपांतर 'शक्ती' नावाच्या चक्रीवादळात झाले.◼️ मुंबईपासून ८०० सागरी मैलांवर आणि गुजरातपासून पश्चिम-दक्षिण दिशेला हे वादळ आहे.◼️ ७ ऑक्टोबरपर्यंत हे वादळ गुजरातकडे सरकेल. मात्र, तोवर त्याचा जोर कमी होईल.◼️ मुंबईला मात्र, या वादळाचा धोका नाही, अशी माहिती हवामान अभ्यासक अश्रेय शेट्टी यांनी दिली.
ऑक्टोबर तापदायक नसेल◼️ यंदा ऑक्टोबर हीटचा त्रास जाणवणार नाही. त्यामुळे हा महिना तितकासा तापदायक नसेल.◼️ ऑक्टोबरमध्ये मुंबईचे कमाल तापमान ३६ किंवा ३७ अंश नोंदविण्यात येते.◼️ यावर्षी कमाल तापमान ३२ ते ३३ अंशांपर्यंत राहील. अशीच कमी-अधिक स्थिती राज्यभरात राहील, असा अंदाज आहे.◼️ त्यामुळे हीटपासून सुटका होणार आहे.
अधिक वाचा: सलग २० वर्ष पाणी वापराचे बजेट मांडणारे राज्यातील 'हे' एकमेव गाव; जाणून घ्या सविस्तर
Web Summary : Maharashtra may experience light to moderate rainfall next week due to Cyclone Shakti's impact, although Mumbai faces no direct threat. October heat will be less severe with temperatures remaining mild. Monsoon exiting after October 12.
Web Summary : चक्रवात शक्ति के प्रभाव से महाराष्ट्र में अगले सप्ताह हल्की से मध्यम बारिश हो सकती है, हालांकि मुंबई को कोई सीधा खतरा नहीं है। अक्टूबर में गर्मी कम होगी और तापमान हल्का रहेगा। मानसून 12 अक्टूबर के बाद खत्म होगा।