Join us
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात या भागात पावसाची शक्यता, तर कोकण वगळता अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 16:20 IST

सध्या राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जाणून घेऊ या १४ फेब्रुवारीपर्यंतचे तपमान.

दि.११ फेब्रुवारी(रविवार) पर्यंत महाराष्ट्रात मध्यम थंडीचा दिलेला अंदाज कायम असुन ढगाळ वातावरणाने थंडी काहीशी कमी झाली आहे. सध्या कमाल व किमान दोन्हीही तापमाने सरासरीपेक्षा वाढीव असली तरी असली तरी रात्री व पहाटे थंडी ही जाणवतच आहे. 

महाराष्ट्रात खालील दिलेल्या ठिकाणी व  तारखेला ढगाळ वातावरणच राहून अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते.  

1. म. महाराष्ट्र-  मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगांव नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अशा एकूण १० -जिल्ह्यात  दि.१० व ११ फेब्रुवारी (शनिवार व रविवार) ला. 

2. मराठवाडा- मराठवाड्यातील सर्व ८ जिल्ह्यात दि. ९, १०,११  फेब्रुवारी (शुक्रवार ते रविवार)ला.               3. विदर्भ -  विदर्भातील सर्व ११ जिल्ह्यात दि.१० ते १४ फेब्रुवारी (शनिवार ते बुधवार)ला विशेषतः १० ते ११ फेब्रुवारी(शनिवार व रविवारी)'ह्या दिवशी पावसाची शक्यता अधिकच जाणवते. 

मुंबईसह कोकणातील ७ जिल्ह्यात मात्र आकाश केवळ निरभ्रच राहून, तेथे केवळ सध्या जी काही थंडी पडत आहे, तशीच थंडी जाणवणार आहे. पावसाची शक्यता मात्र तेथे जाणवत नाही. 

-माणिकराव खुळे, हवामानशास्त्रज्ञ (निवृत्त)आयएमडी, पुणे

टॅग्स :हवामानपाऊसविदर्भ