lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > महाराष्ट्रात आणखी मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांची शक्यता, काय सांगताहेत तज्ञ?

महाराष्ट्रात आणखी मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांची शक्यता, काय सांगताहेत तज्ञ?

Chances of more major earthquakes in Maharashtra, what do experts say? | महाराष्ट्रात आणखी मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांची शक्यता, काय सांगताहेत तज्ञ?

महाराष्ट्रात आणखी मोठ्या भूकंपाच्या धक्क्यांची शक्यता, काय सांगताहेत तज्ञ?

महाराष्ट्रात या भागात भूकंपाची शक्यता, कशी घ्याल काळजी?

महाराष्ट्रात या भागात भूकंपाची शक्यता, कशी घ्याल काळजी?

शेअर :

Join us
Join usNext

महाराष्ट्रासह भारतात येत्या काळात भूकंप वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी सावध होणे गरजेचे असल्याचे प्राध्यापक किरणकुमार जोहरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. 

आज हिंगोली, नांदेड आणि परभणीत आज सकाळी दहा मिनिटांच्या अंतराने दोन भूकंपाचे धक्के बसल्याची घटना घडली. हा भूकंप ४.६ रिश्टर एवढ्या तीव्रतेचा असल्याचे नॅशनल सेंटर फॉर सिसमॉलॉजीने सांगितले. 

दरम्यान, हा भूकंप होण्यामागे सूर्यमालेतील  घडामोडींचा परिणाम पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणावर होत आहे. त्यामुळे येत्या काळात भूकंपाचे मोठे धक्के भारत व जगभरातील विविध देशांना बसण्याची शक्यता असल्याचेही जोहरे यांनी सांगितले. यातही उत्तर महाराष्ट्र कोकण किनारपट्टी भागात सौम्य धक्यांची संभावना असल्याचे ते म्हणाले.

सेंटर फॉर सिसमॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, भूगर्भात १० किमी एवढ्या खोलीवर घर्षण झाले. या भूकंपाची तीव्रता ४.६ रिश्टर एवढी होती. ही खोली फार अधिक नसल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे याहून मोठा धक्का बसण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे.

भूकंप आला तर काय काळजी घ्यावी?

भूकंपाच्या पूर्वी, भूकंप येताना आणि त्यानंतर अशी तीन प्रकारात नागरिकांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.

१. भूकंप येईल किंवा तशी चिन्हे दिसत असतील तर ताबडतोब गॅसचा नॉब बंद करणे आवश्यक आहे. कारण जगभरात भूकंपग्रस्त भागात अशा वेळेत सिलेंडरच्या स्फोटातून नुकसान झाल्याचे दाखले सापडतात.

२. वीजेचा प्रवाह गरज नसेल तर तो वेळीच बंद करावा.

३. आपल्या डोक्यावर जड वस्तू पडणार नाही याची काळजी घ्यावी.

४. भूकंपाचे धक्के जाणवत असतील तर लिफ्टचा वापर करू नये.

५. पिण्याचे पाणी, औषधे, सोबत ठेवावी.

६. रात्रीच्या वेळी भूकंप झाला तर घरातून बाहेर जाण्यासाठी गरोदर महिला, वृद्ध व लहान मुलांना प्राधान्य देत त्यांना मानसिक बळ द्यावे.

७. प्रशासनाला सहकार्य करावे.

Web Title: Chances of more major earthquakes in Maharashtra, what do experts say?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.