Join us
Daily Top 2Weekly Top 5

उत्तर भारतातील हवामानात मोठे बदल; राज्यात 'या' तारखेपासून पुन्हा थंडी सुरु होणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 08:43 IST

उत्तर भारतावर पुन्हा एकदा पश्चिमी प्रकोप (वेस्टर्न डिस्टर्बन्स) निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात उत्तर भारताच्या टोकावर बर्फवृष्टी होणार आहे.

मुंबई : उत्तर भारतावर पुन्हा एकदा पश्चिमी प्रकोप (वेस्टर्न डिस्टर्बन्स) निर्माण होण्याची शक्यता आहे. या काळात उत्तर भारताच्या टोकावर बर्फवृष्टी होणार आहे.

या बदलत्या हवामानामुळे किमान तापमानात घट होणार आहे. परिणामी मुंबईसह राज्यात थंडीचा प्रभाव जाणवणार असून, हा बदल २६ जानेवारीनंतर जाणवणार आहे.

मुंबईचे किमान तापमान आठवड्याच्या सुरुवातीला १६ अंशावर घसरले होते. परिणामी मुंबईत ठिकठिकाणी आलेल्या गारव्याने थंडीचा आनंद लुटला होता.

आता तापमान २० अंशावर स्थिर असले तरी २६ जानेवारीनंतर मुंबईसह राज्याच्या किमान तापमानात घट होणार आहे. मंगळवारी मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा दर्जा समाधानकारक होता.

अधिक वाचा: शक्तीपीठ महामार्ग आराखड्यात केले ‘हे’ मोठे बदल; कसा आहे नवीन आराखडा? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : North India Weather Shift: Cold Wave to Return After January 26?

Web Summary : Western disturbance may bring snowfall to North India, lowering temperatures. Mumbai, Maharashtra, will feel colder after January 26, following an earlier dip to 16 degrees. Air quality remains satisfactory.
टॅग्स :हवामान अंदाजहिवाळातापमानभारतमहाराष्ट्रमुंबई