Join us

भंडारदरा धरण ५० टक्के भरले; लाभक्षेत्रात समाधानाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 13:30 IST

Bhandardara Water Storage : उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची भाग्यरेखा भंडारदरा धरण प्रथमच जूनच्या अखेरच्या आठवड्यात आज (गुरुवारी) ५० टक्के भरले. यावर्षी मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात कधी नव्हे एव्हढा पाऊस पडला. १७ मेपासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस सुरू झाला.

उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याची भाग्यरेखा भंडारदरा धरण प्रथमच जूनच्या अखेरच्या आठवड्यात आज (गुरुवारी) ५० टक्के भरले. यावर्षी मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मे महिन्यात कधी नव्हे एव्हढा पाऊस पडला. १७ मेपासून मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस सुरू झाला.

त्या दिवसापासून भंडारदरा धरणात नवीन पाण्याची आवक सुरू झाली. धरणात अवघे ५ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली होती. मात्र वीजनिर्मितीसाठी धरणातून पाणी सोडण्यात येत होते. जूनच्या मध्यानंतर धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी बंद करण्यात आले. असे असले तरी पावसाचे प्रमाणही सातत्याने वाढत गेले.

१७ जून रोजी धरणातील पाणीसाठा २ हजार ५८६ दलघफू इतका होता. याच आठवड्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात धो-धो पाऊस पडला आणि धरण साठ्यात झपाट्याने वाढ झाली.

दि. १९ जूनला धुवाधार पाऊस कोसळला. या नंतरही पावसाचे प्रमाण टिकून राहिल्याने गुरुवारी (दि. २६) सकाळी भंडारदरा धरणात २८२ दलघफू नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा ४९ टक्क्यांहून अधिक झाला. सायंकाळी ६ वाजता धरणात नवीन पाण्याची आवक होत पाणीसाठा पाच हजार ५४२ दलघफू इतका झाला आणि धरण जून महिन्यातच ५० टक्के भरले.

दरम्यान, निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचे प्रमाण टिकून असल्याने या धरणातही नवीन पाण्याची आवक होते आहे. गुरुवारी सकाळी २८२ दलघफू नवीन पाण्याची आवक झाली आणि पाणीसाठा ३ हजार ५३० दलघफू पर्यंत पोहोचला.

झालेला पाऊस (मि.मी.)

गावे आजचा आत्तापर्यंत
रतनवाडी७८ (१०७०)
घाटघर १०२ (१०४८)
पांजरे ७८ (६७६)
भंडारदरा ७५ (६५९)
वाकी ४९ (४४३)

हेही वाचा : 'लिंबू' फळबागेने दिली आयुष्याला कलाटणी; ३० गुंठ्यांमध्ये रानबा खरातांनी साधली आर्थिक प्रगती

टॅग्स :जलवाहतूकअहिल्यानगरधरणनदीगोदावरीपाणी