lokmat Supervote 2024
Lokmat Agro >हवामान > फ्लेमिंगो, पाणकावळ्यांसह 'जायकवाडी'त आढळले ३१२ पक्षी, पाणी कमी झाल्याने संख्या होणार कमी

फ्लेमिंगो, पाणकावळ्यांसह 'जायकवाडी'त आढळले ३१२ पक्षी, पाणी कमी झाल्याने संख्या होणार कमी

312 birds found in 'Jaikwadi' including flamingos, pankawals, the number of birds will decrease due to decrease in water | फ्लेमिंगो, पाणकावळ्यांसह 'जायकवाडी'त आढळले ३१२ पक्षी, पाणी कमी झाल्याने संख्या होणार कमी

फ्लेमिंगो, पाणकावळ्यांसह 'जायकवाडी'त आढळले ३१२ पक्षी, पाणी कमी झाल्याने संख्या होणार कमी

वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जायकवाडी पक्षी अभयारण्यात रविवारी एशियन पाणथळ पक्षीगणना करण्यात आली.

वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जायकवाडी पक्षी अभयारण्यात रविवारी एशियन पाणथळ पक्षीगणना करण्यात आली.

शेअर :

Join us
Join usNext

वन विभाग व बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जायकवाडी पक्षी अभयारण्यात रविवारी एशियन पाणथळ पक्षीगणना करण्यात आली. २१ ठिकाणी करण्यात आलेल्या या गणनेत ३१२ पक्षी आढळले आहेत.

पैठण येथील जायकवाडी पक्षी अभयारण्य ३४० हेक्टर क्षेत्रावर पसरले असून, या अभयारण्यात रविवारी सकाळी ७ वाजता ढाकेफळ, पिंपळवाडी, सोनेवाडी, कन्हे टाकळी, जायकवाडी आदी २१ ठिकाणी पक्षी गणना करण्यात आली. यात फ्लेमिंगो, पाणकावळे, जांभळी पाणकोंबडी, हळदी-कुंकू बदक, लहान बगळा, व्हाइट नेक आयबिसग् लॉसी आयबिस, नदी सुराय, पोचार्ड, नॉर्थान श्वाव्हलर आदी ३१२ पक्ष्यांची नोंद वन विभागाने केली आहे. जायकवाडी अभयारण्यातील पक्षी संख्या घटली असून, बदलते हवामान, खाद्याचा अभाव व कमालीची घटलेली पाणी पातळी यामुळे पक्षी संख्या घटण्याची शक्यता पक्षीमित्र प्रा. संतोष गव्हाणे यांनी व्यक्त केली.

या पक्षी गणनेत येथे मोठ्या प्रमाणात आढळणाऱ्या फ्लेमिंगोंची संख्या हाताच्या बोटावर मोजण्याएवढी असून, रामडोह येथे २४ तर बोरगाव येथे २५ च्या संख्येने आढळून आल्याचे रामडोह गटातील पक्षी अभ्यासकांनी सांगितले. विभागीय वन अधिकारी अभय अटकळ, पक्षी अभ्यासक मानद वन्यजीव रक्षक किशोर पाठक, पक्षी मित्र प्रा. संतोष गव्हाणे, दिलीप भगत, डॉ. दीपक जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली ही गणना करण्यात आली. यात वन विभागातर्फे वनरक्षक रूपाली सोळसे, डॉ. दीपक जायभाये, कुणाल विभाडिक, रूपाली सोळसे, शेख, दीपक दांडगे आदींनी सहभाग घेतला.

जायकवाडीत ४०.९१ टक्के

औरंगाबाद विभागात एकूण ९२० धरणे आहेत.मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या लहान मोठ्या व मध्यम प्रकल्पांमध्ये आज २४३६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. निम्न दुधना धरणात आज १७.८१ टक्के पाणीसाठा उरला आहे. तर जायकवाडी जलाशयात आज दिनांक १८ जानेवारी रोजी, सकाळी ८.०३ वाजता ४०.९१ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

Web Title: 312 birds found in 'Jaikwadi' including flamingos, pankawals, the number of birds will decrease due to decrease in water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.