Join us
Daily Top 2Weekly Top 5

पारंपरिक शेतीला सुपरफूडचा आधार; चिया शेतीतून लक्षमणरावांनी घेतले साडेआठ लाखांचे उत्पन्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2026 10:34 IST

Success Story : बदलत्या हवामानाचा लहरीपणा आणि कापूस-सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांच्या कोसळत्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, पारडी येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण भुजंगराव रोकडे यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.

गोविंद कदम 

बदलत्या हवामानाचा लहरीपणा आणि कापूस-सोयाबीनसारख्या पारंपरिक पिकांच्या कोसळत्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला असताना, नांदेड जिल्ह्याच्या लोहा तालुक्यातील पारडी येथील प्रगतिशील शेतकरी लक्ष्मण भुजंगराव रोकडे यांनी नवा आदर्श निर्माण केला आहे.

त्यांनी आपल्या सहा एकर क्षेत्रात सुपरफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिया पिकाची सेंद्रिय पद्धतीने लागवड करून साडेतीन महिन्यांत ८ लाख ५० हजार रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे.

रोकडे यांनी अभ्यासपूर्वक चिया पिकाचा प्रयोग केला. त्यांना सहा एकरातून तब्बल ३५ ते ३६ क्विंटल उत्पादन मिळाले. सध्या बाजारात चियाला २२ ते २४ हजार रुपये प्रति क्विंटल दर मिळत असून, त्यांना या प्रयोगातून साडेआठ लाखांचा नफा झाला आहे. पारंपरिक पिकांच्या तुलनेत हा परतावा अधिक असल्याने परिसरात या प्रयोगाची मोठी चर्चा आहे.

चिया हे पीक कोरडवाहू भागासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या पिकाच्या वैशिष्ट्यांबाबत रोकडे सांगतात की, चियाला अतिशय कमी पाणी लागते आणि उत्पादन खर्चही कमी आहे.

विशेष म्हणजे या पिकाच्या पानांना एक विशिष्ट वास असल्याने वन्य प्राणी या पिकाचे नुकसान करत नाहीत. गहू, हरभरा किंवा सोयाबीनपेक्षा हे अधिक फायदेशीर आहे. महाराष्ट्रात वाशिम येथे या बियाण्यांसाठी मोठी बाजारपेठ उपलब्ध असून तिथे दरही स्थिर आहेत.

जागतिक बाजारपेठेत या पिकाला सुवर्णकाळ

चिया बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, प्रथिने आणि तंतुमय घटक (फायबर) मुबलक असतात. जागतिक बाजारपेठेत वाढत्या मागणीमुळे या पिकाला भविष्यात सुवर्णकाळ असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. रोकडे यांच्या या यशस्वी प्रयोगामुळे लोहा तालुक्यातील शेतीला आता आधुनिक आणि सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे.

हेही वाचा : परिस्थितीशी झुंज देत विजयालक्ष्मी यांची दुग्धव्यवसायात भरारी; आता महिन्याकाठी १ लाख रुपयांची कमा

English
हिंदी सारांश
Web Title : Superfood Chia Supports Traditional Farming: Farmer Earns Lakhs

Web Summary : Laxman Rokde earned ₹8.5 lakhs in 3.5 months by cultivating chia seeds organically on six acres in Nanded, Maharashtra. Chia requires less water, has low production costs, and is resistant to animal damage, making it a profitable alternative to traditional crops like cotton and soybean.
टॅग्स :शेतकरी यशोगाथानांदेडपीकशेती क्षेत्रशेतकरीशेतीबाजारविदर्भमराठवाडा