बालाजी बिराजदार
धाराशिव जिल्ह्याच्या लोहारा तालुक्यातील धानुरी येथील एका तरुण शेतकऱ्याने एक एकर पत्ताकोबीतून आतापर्यंत एक लाख रुपयाचे उत्पन्न घेतले. असून अजून दीड लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. यामुळे या एक एकर कोबीमध्ये या शेतकऱ्याला अडीच लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे.
धानुरी येथील धनंजय सुरवसे कोळी यांचे शिक्षण बीएससीपर्यंत झाले. शिक्षणानंतर नोकरीचा शोध घेत असताना त्यांनी तुळजापूर येथील द्राक्ष निर्यातमध्ये नोकरी स्वीकारली. परंतु, नोकरीत मन रमत नसल्याने त्यांनी गावी येऊन शेती करण्याचा निर्णय घेतला.
त्यांच्याकडे एकूण सात एकर जमीन असून, यात दोन बोअर व एक विहीर आहे. यामुळे त्यांची शेती पूर्ण पाण्याची आहे. याचाच फायदा घेत शेतकरी धनंजय सुरवसे यांनी या शेतीत पारंपरिक पिके न घेता फळ पिके, भाजीपाला करण्याचा निर्णय घेतला आणि तो निर्णय अगदी योग्यही ठरला.
यावर्षी त्यांनी एक एकर क्षेत्रामध्ये पत्ताकोबीची लागवड केली होती. साधारण लागवडीनंतर अडीच महिन्यात कोबी विक्रीला येतो. यासाठी त्यांना ३५ ते ४० हजार रुपये लागवड खर्च आला आहे.
त्यांनी आतापर्यंत एक लाख रुपयेची पत्ता कोबी विक्री केली. अजून साधारण दीड लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे. त्यामुळे सुरवसे यांना या एक एकर कोबीतून अडीच लाख रुपयाचे उत्पादन मिळणार आहे.
चार एकरावर कांदा
एक एकर पत्ताकोबीबरोबरच चार एकर व कांदा लावला आहे. या चार एकर कांदा लागवडीसाठी त्यासाठी दीड ते दोन लाख रुपये खर्च झाला आहे. या चार एकर कांद्यातून पाच ते सहा लाख रुपये उत्पादन अपेक्षित आहे. असे शेतकरी धनंजय सुरवसे सांगतात.
हेही वाचा : Success Story : शेतीपूरक जोडधंदाची धरली वाट; भारत पाटलांची संकटांवर मात