Lokmat Agro >लै भारी > Spices Crop : दुष्काळी पारंपारिक पिकांना फाटा देत मसाला शेतीतून विदर्भातील शेतकऱ्याने घडवली क्रांती

Spices Crop : दुष्काळी पारंपारिक पिकांना फाटा देत मसाला शेतीतून विदर्भातील शेतकऱ्याने घडवली क्रांती

Spices Crop: Farmers in Vidarbha create revolution through spice farming, replacing drought-prone traditional crops | Spices Crop : दुष्काळी पारंपारिक पिकांना फाटा देत मसाला शेतीतून विदर्भातील शेतकऱ्याने घडवली क्रांती

Spices Crop : दुष्काळी पारंपारिक पिकांना फाटा देत मसाला शेतीतून विदर्भातील शेतकऱ्याने घडवली क्रांती

मसाला शेतीमुळे पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक परतावा मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी या दिशेने वाटचाल करत आहेत. मसाला शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुझफ्फर हुसैन हे मार्गदर्शनही करतात.

मसाला शेतीमुळे पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक परतावा मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी या दिशेने वाटचाल करत आहेत. मसाला शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुझफ्फर हुसैन हे मार्गदर्शनही करतात.

शेअर :

Join us
Join usNext

विदर्भातील कोरडवाहू पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकरी मुझफ्फर हुसैन यांनी मसाला शेतीमध्ये आपलं प्रस्थ तयार केलंय. कमी पाणी, कमी खर्च आणि अधिक नफा या तत्त्वावर आधारित केलेली मसाला शेती आज त्यांना वेगळ्या उंचीवर घेऊन गेली आहे. विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी त्यांचे मसाला शेतीतील प्रयोग रोल मॉडेल ठरत आहेत.

मुझफ्फर हुसैन यांनी पारंपारिक पिकांची शेती करण्यापेक्षा अधिक फायदेशीर आणि शाश्वत मूल्यवर्धित मसाला शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला. कृषी तज्ज्ञ डॉ. एम.एन. वेणुगोपाल (Former H.O.D. Spice Division, ICAR) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काळी मिरी, हळद, काळे आलं, काजू, तमालपत्र, कोकम, जायफळ, दालचिनी, इलायची यांसारख्या महागड्या पिकांची लागवड करून त्यातून चांगला नफा मिळवला आहे. आधुनिक तंत्रज्ञान, योग्य नियोजन आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोनाच्या सहाय्याने त्यांनी मसाला शेतीचा एक यशस्वी प्रयोग राबवला, जो आज विदर्भातील अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

शाश्वत आणि आधुनिक तंत्रज्ञानाने शेती

  • आधुनिक आणि सेंद्रिय तंत्रज्ञानाचा समतोल साधत प्रभावी शेती पद्धतींचा अवलंब 
  • ड्रिप इरिगेशन तंत्राद्वारे कमी पाण्यात अधिक उत्पादन घेण्यावर भर 
  • सेंद्रिय शेती स्विकारून रासायनिक खतांऐवजी जैविक खतांचा वापर 
  • बहुपीक पद्धती (मल्टी-क्रॉपिंग) चा अवलंब करून जमिनीची सुपीकता टिकवली आणि उत्पादन क्षमता वाढवली 
  • स्मार्ट तंत्रज्ञान वापरून हवामानातील बदल लक्षात घेऊन पीक पद्धतीत आवश्यक सुधारणा  
  • जलसंधारण तंत्रज्ञान, नैसर्गिक कीड नियंत्रण आणि मल्चिंग यांसारख्या तंत्रांची प्रभावी अंमलबजावणी करून त्यांनी मसाला शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर बनवली 

 

कोणत्या पिकांची लागवड?
अन्नधान्ये पीके :
ज्वारी, मका, बाजरी, चारा, गहू, भाजीपाला 
मसाल्याचे व फळझाडे : आलं, हळद, वेलदोडा (वार्षिक पीक), काजू, दालचिनी, कोकम, काळी मिरी, चिंच, ऊस, आंबा, सिताफळ, संत्रा, मोसंबी.
५ वर्षांनंतर वार्षिक उत्पन्न देणारी पिके : जॅकफ्रूट (फणस).
३ वर्षांनी वार्षिक उत्पादन देणारी पिके : काजू, बांबू.
लाकूड देणारी झाडे - सिल्व्हर ओक, महोगनी, जॅकफ्रूट

शेतमालाची विक्री व प्रक्रिया
आंबा, सिताफळ, संत्रा आणि मोसंबी हे थेट मार्केटमध्ये विक्री केले जाते.काजू मल्टिप्लिकेशन, केसर मल्टिप्लिकेशन, काळी मिरी रोपांचे उत्पादन यांच्या शेतावर केले जाते. यासोबतच ३ प्रकारच्या हळदीची देखील पावडर  आणि काळ्या आल्याची पावडर बनवून त्याचे पॅकेजिंग व कॅप्सूल उत्पादन केले जातचे. शेतमाल, प्रकिया केलेले पदार्थ विक्री करून ते वर्षाकाठी लाखोंची कमाई करतात.

शेतकऱ्यांना मार्गदर्शन
मसाला शेतीमुळे पारंपरिक पिकांच्या तुलनेत अधिक आर्थिक परतावा मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी या दिशेने वाटचाल करत आहेत. मसाला शेती करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी मुझफ्फर हुसैन हे मार्गदर्शनही करतात. यात जैविक खतांचा वापर, योग्य पीक निवड, कीड नियंत्रण, मल्चिंग, जलसंधारण आणि विपणन यासंबंधी मार्गदर्शन दिले जाते. यामुळे शेतकऱ्यांना फायदा होत असून अनेक शेतकरी मसाला शेतीकडे वळताना दिसत आहेत.

Web Title: Spices Crop: Farmers in Vidarbha create revolution through spice farming, replacing drought-prone traditional crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.