Lokmat Agro >लै भारी > कृषीभूषण सुनील यांची कमाल; उसाला फाटा देत पपईने केली एकरात १०० टनाची धमाल

कृषीभूषण सुनील यांची कमाल; उसाला फाटा देत पपईने केली एकरात १०० टनाची धमाल

outstanding work by Krishibhushan Anandrao; divert from sugarcane, papaya produced 100 tons per acre | कृषीभूषण सुनील यांची कमाल; उसाला फाटा देत पपईने केली एकरात १०० टनाची धमाल

कृषीभूषण सुनील यांची कमाल; उसाला फाटा देत पपईने केली एकरात १०० टनाची धमाल

आष्टा येथील कृषी भूषण सुनील आनंदराव माने यांनी ऊस शेतीला फाटा देत नऊ एकरांवर पपईची लागवड केली आहे. या शेतकऱ्याने एकरी सहा लाख रुपयांचे (१०० टन) उत्पन्न मिळविले आहे. मुंबई, पुणे, कलकत्ता, गोवा यांसह स्थानिक बाजारपेठेत पपई विक्रीसाठी पाठविली जात असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

शेअर :

Join us
Join usNext

सुरेंद्र शिराळकर
आष्टा येथील कृषी भूषण सुनील आनंदराव माने यांनी ऊस शेतीला फाटा देत नऊ एकरांवर पपईची लागवड केली आहे. या शेतकऱ्याने एकरी सहा लाख रुपयांचे (१०० टन) उत्पन्न मिळविले आहे. मुंबई, पुणे, कलकत्ता, गोवा यांसह स्थानिक बाजारपेठेत पपई विक्रीसाठी पाठविली जात असल्याचे शेतकऱ्याने सांगितले.

सुनील माने यांनी नऊ एकर पपईची लागवड केली आहे. त्यांनी शेताची उभी आडवी नांगरट करून दोन वेळा रोटर फिरवीत दहा ट्रॉली शेणखत घालून ९ फूट रुंदीचे बेड तयार केले आहेत. रासायनिक खतांचा डोस देऊन दोन्ही बाजूंनी ठिबक पाईप अंथरून ठिबकने पाणी दिले. जून २०२३ ला ९ बाय ५ फूट अंतरावर आईस बेरी पपईची चार एकर क्षेत्रात रोपे लावली आहेत.

आजअखेर आठ टन उत्पादन मिळाले असून, एकरी ६० टन उत्पादन मिळेल. सरासरी सहा लाखांपर्यंत उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. एकरी एक ते दीड लाख रुपये खर्च झाला आहे. पेंशन बेरीचे आणि १५ क्रमांक पपईची लागण केली आहे.

अधिक वाचा: बारामती तालुक्यातील युवा शेतकऱ्याचा विषमुक्त दुध निर्मितीचा प्रयोग

पपईची वैशिष्ट्ये
• १५ क्रमांक पपई : प्रवासात टिकते, वजनही मिळते.
• आईस बेरी : भगवा पट्टा असून, गाभा जास्त आहे. उत्पादनही चांगले मिळते.
• पॅशन बेरी : लांब असून संख्या जास्त असल्याने विरळणी करावी लागते.

Web Title: outstanding work by Krishibhushan Anandrao; divert from sugarcane, papaya produced 100 tons per acre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.