Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > थायलंडचे ऑर्किड इस्लामपुरातील पाटलांच्या शेतात; दहा गुंठ्यात ५ लाखांचे उत्पन्न

थायलंडचे ऑर्किड इस्लामपुरातील पाटलांच्या शेतात; दहा गुंठ्यात ५ लाखांचे उत्पन्न

Orchids of Thailand at Patil farm in Islampur; 5 lakhs income in ten gunta | थायलंडचे ऑर्किड इस्लामपुरातील पाटलांच्या शेतात; दहा गुंठ्यात ५ लाखांचे उत्पन्न

थायलंडचे ऑर्किड इस्लामपुरातील पाटलांच्या शेतात; दहा गुंठ्यात ५ लाखांचे उत्पन्न

थायलँड या देशातील ९ हजार ऑर्किड रोपे मोहन पाटील यांनी इस्लामपुरात आयात करून त्याची दहा गुंठ्यात लागण केली. रोपांसाठी अंदाजे साडेचार लाख रुपये खर्च करावा लागला.

थायलँड या देशातील ९ हजार ऑर्किड रोपे मोहन पाटील यांनी इस्लामपुरात आयात करून त्याची दहा गुंठ्यात लागण केली. रोपांसाठी अंदाजे साडेचार लाख रुपये खर्च करावा लागला.

अशोक पाटील
इस्लामपूर : थायलँड या देशातील ९ हजार ऑर्किड रोपे मोहन पाटील यांनी इस्लामपुरात आयात करून त्याची दहा गुंठ्यात लागण केली. रोपांसाठी अंदाजे साडेचार लाख रुपये खर्च करावा लागला. प्रारंभीच्या टप्प्यात ग्रीन हाऊस उभे करण्यासाठी त्यांना २० लाख रुपये खर्च आला. रोपांची लागण केल्यानंतर त्यांना वर्षाकाठी ५ लाख रुपये निव्वळ नफा झाला.

तारांकित शहरे असलेली मुंबई, पुणे, हैदराबाद आदी शहरात या फुलांची निर्यात होते. २० काड्यांचा एक गुच्छ याला फुलांच्या बाजारात ३०० ते ४०० रुपये मिळतात. रोपांची लागण केल्यानंतर सलग दहा वर्षे याचे उत्पन्न सुरू राहते. त्यामुळे अल्प क्षेत्रात जास्त आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे ऑर्किड फुलांची शेती शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरली आहे.

मोहन पाटील यांनी राज्य विद्यत महामंडळात नोकरी केली. त्यानंतर शेती वळले. खेड रस्त्याला असलेल्या त्यांच्या शेतीत उसाव्यतिरिक्त कोणतेच पीक घेतले जात नव्हते. उसातून मिळणारे उत्पन्नही तोकडेच असल्याने त्यांनी थायलँडमधून ऑर्किडची रोपे आयात केली आणि त्याची लागण केली.

दहा गुंठ्यात ५ लाखांचे उत्पन्न
थायलँड या देशातील ९ हजार ऑर्किड रोपे मोहन पाटील यांनी इस्लामपुरात आयात करून त्याची दहा गुंठ्यात लागण केली. रोपांसाठी अंदाजे साडेचार लाख रुपये खर्च करावा लागला. प्रारंभीच्या टप्प्यात ग्रीन हाऊस उभे करण्यासाठी त्यांना २० लाख रुपये खर्च आला. रोपांची लागण केल्यानंतर त्यांना वर्षाकाठी ५ लाख रुपये निव्वळ नफा झाला.

अधिक वाचा: पॉलीहाऊसमधील ढोबळी मिरचीने वागदरे बंधूंच्या शेतीला आली रंगत

Web Title: Orchids of Thailand at Patil farm in Islampur; 5 lakhs income in ten gunta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.