Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >लै भारी > Tarbuj Farming : आधुनिक शेतीचा प्रयोग, क्षारयुक्त जमिनीत टरबुजाचे यशस्वी उत्पादन, एकरात लाखोचे उत्पन्न

Tarbuj Farming : आधुनिक शेतीचा प्रयोग, क्षारयुक्त जमिनीत टरबुजाचे यशस्वी उत्पादन, एकरात लाखोचे उत्पन्न

Latest news Modern farming experiment, successful production of watermelon in saline soil, income of lakhs per acre | Tarbuj Farming : आधुनिक शेतीचा प्रयोग, क्षारयुक्त जमिनीत टरबुजाचे यशस्वी उत्पादन, एकरात लाखोचे उत्पन्न

Tarbuj Farming : आधुनिक शेतीचा प्रयोग, क्षारयुक्त जमिनीत टरबुजाचे यशस्वी उत्पादन, एकरात लाखोचे उत्पन्न

Tarbuj Farming : काळ्या व सुपीक जमिनीवर घेतले जाणारे टरबूज पिकवल्याने तरुण शेतकऱ्याच्या यशोगाथेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Tarbuj Farming : काळ्या व सुपीक जमिनीवर घेतले जाणारे टरबूज पिकवल्याने तरुण शेतकऱ्याच्या यशोगाथेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

नाशिक : निफाड तालुक्यातील गोदाकाठ भागातील करंजी येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत खळगाट व क्षारयुक्त नापीक जमिनीत टरबूज शेतीची यशस्वी लागवड करून टरबूज पिकवले आहे. काळ्या व सुपीक जमिनीवर घेतले जाणारे टरबूज पिकवल्याने तरुण शेतकऱ्याच्या यशोगाथेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

करंजी येथील कृषी अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या सिद्धांत योगेश अडसरे या तरुणाने पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेतीकडे पाऊल टाकले गोदावरी नदीकिनारी असलेल्या जमिनीत वाढलेले क्षार यामुळे नापीक झालेल्या जमिनी कसण्यास योग्य राहिल्या नाहीत. 

शेतीचे शिक्षण घेतलेल्या अडसरे या तरुणाने परिसरातील शेतकऱ्यांना एकत्र घेत पारंपरिक शेतीऐवजी आधुनिक शेती करण्याकडे शेतकरी वळला पाहिजे. त्यातून अधिकचे उत्पन्नदेखील मिळेल. शेतकऱ्यांना पटवून देत दोन महिन्यांपूर्वी पहिल्यांदा स्वतःच्या शेतात दि. १३ फेब्रुवारीला टरबुजाची यशस्वी लागवड केली होती. 

त्याला रासायनिक व शेणखताचा वापर करून वाढवले. आता त्यात फळधारणा झाली असून, लाखो रुपयांचे टरबूज सिद्धांत याने पिकवले आहे. या प्रयोगाचा गोदाकाठ परिसरातील शेतकरी वर्गाला लाभ घेता येणार आहे.

प्रति एकर ८० हजार खर्च
प्रति एकरला लागवड ते काढणीपर्यंत सत्तर ते ऐंशी हजार रुपये इतका खर्च येतो. त्यात काडी, ड्रीप, मल्चिंग, बेलस डोस, पीजीआर औषधे यांचा समावेश आहे. त्यातून सरासरी एकरी उत्पन्न अडीच ते तीन लाखापर्यंत मिळते.

आधुनिक पद्धतीने काकडी, टोमॅटो, कोबी, फ्लॉवर, पालेभाज्या, डाळिंब, पेरू, द्राक्ष, फळबाग व फुलशेती करण्याचा मानस आहे. गावातील शेतकरी तरुणांना मार्गदर्शन करून पुढे घेऊन जायचे आहे.
- सिद्धांत अडसरे, तरुण शेतकरी

Web Title : तरबूज की खेती: खारे पानी की मिट्टी में आधुनिक कृषि से लाखों की कमाई।

Web Summary : नासिक के एक युवा किसान ने आधुनिक तकनीकों का उपयोग करके खारे पानी की मिट्टी में सफलतापूर्वक तरबूज की खेती की। चुनौतियों के बावजूद, उन्होंने उच्च उपज प्राप्त की, जिससे स्थानीय किसानों को बढ़ी हुई आय के लिए नवीन कृषि पद्धतियों को अपनाने की प्रेरणा मिली। उनका उद्देश्य विभिन्न फसलों की खेती करना और अन्य युवा किसानों का मार्गदर्शन करना है।

Web Title : Watermelon Farming: Modern agriculture yields success in saline soil, earns lakhs.

Web Summary : A young farmer in Nashik successfully cultivated watermelons in saline soil using modern techniques. Despite challenges, he achieved high yields, inspiring local farmers to adopt innovative agricultural practices for increased income. He aims to cultivate various crops and guide other young farmers.