- किरण माने
शेळगाव : "इथे फक्त काट्याकुट्या उगवतात..." अशी ओळख असलेल्या व्याहाळीच्या खडकाळ माळरानाने आपली ओळखच बदलली आहे. कारण या उजाड रानावर शेळगाव येथील प्रगतशील शेतकरी अतुल शिंगाडे, शिवाजी शिंगाडे आणि देवई शिंगाडे या माय-लेकांनी अक्षरशः हिरवळ फुलवली आहे.
केवळ पारंपरिक पिकांपुरते मर्यादित न राहता त्यांनी चक्क सफरचंदाची बाग फुलवून कृषी क्षेत्रात नवा आदर्श निर्माण केला आहे. गेल्या १०-१२ वर्षात शिंगाडे कुटुंबाने माळरानाचे 'सोने' करत ५० एकरांहून अधिक क्षेत्रावर फळबाग विकसित केली. आहे. यात ३० एकर डाळिंब, २० एकर पेरू, ३ एकर सफरचंद आणि ५ एकर पपईची लागवड आहे.
याशिवाय ड्रॅगन फ्रूट, सिमला मिरची आणि उसासारखी पिकेही त्यांनी यशस्वीपणे घेतली आहेत. नियोजन, कष्ट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर त्यांनी वार्षिक कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. दोन वर्षांपूर्वी शिमला येथून 'अण्णा' आणि इतर जातींची सफरचंदाची रोपे आणून तीन एकरांवर लागवड करण्यात आली. अनुभवाच्या अभावामुळे काही अडचणी आल्या. मात्र त्यातून शिकत शिंगाडे कुटुंबाने योग्य व्यवस्थापन केले.
निर्यातक्षम शेतीचा आदर्श
शिंगाडे कुटुंब केवळ स्थानिक बाजारपेठेवर अवलंबून नाही. गेल्या दशकभरापासून त्यांच्या शेतातील डाळिंब आणि पेरू थेट रशिया, जपान, मलेशिया आणि दुबई येथे निर्यात होत आहेत. निर्यातीसाठी आवश्यक असलेले दर्जेदार उत्पादन, प्रतवारी, पॅकिंग आणि 'रेसिड्यू फ्री' पद्धती यावर त्यांनी विशेष भर दिला आहे.
.... दहा वर्षांपासून थेट परदेशात निर्यात
स्थानिक शिंगाडे कुटुंब केवळ बाजारावर अवलंबून नाही. गेल्या १०-१२ वर्षांपासून त्यांच्या माळरानावर पिकवलेले डाळिंब आणि पेरू रशिया, जपान, मलेशिया आणि दुबईला निर्यात होत आहे. निर्यातक्षम मालासाठी प्रतवारी, पॅकिंग आणि रेसिड्यू फ्री उत्पादन यावर आमचा भर असतो. त्यामुळे थेट एक्स्पोर्टर बांधावरून माल उचलतात आणि चांगला दर मिळतो, असे शिवाजी शिंगाडे यांनी सांगितले.
प्रेरणादायी आदर्श
व्याहाळीसारख्या खडकाळ आणि उजाड माळरानावर सफरचंद, डाळिंब, पेरू आणि पपईसारखी पिके घेणे ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. "शिंगाडे कुटुंबाने या भागात नवा आदर्श निर्माण केला आहे," असे मत तालुका कृषी अधिकारी दीपक गरगडे यांनी व्यक्त केले.
शेळगावच्या शिंगाडे कुटुंबाने माळरान असलेल्या भागात नवा आदर्श निर्माण केला. व्याहाळीसारख्या खडकाळ माळरानावर सफरचंद, डाळिंब पेरू आणि पपईची शेती ते पिकवतात ही अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे.
- दीपक गरगडे, तालुका कृषी अधिकारी, इंदापूर
आई किंवा वडिलांनी दुसरे लग्न केल्यास सावत्र मुलांना मालमत्तेत हक्क मिळतो का? वाचा सविस्तर
