Join us

Farmer Success Story : एकात्मिक शेतीतून श्रीधर गुंजकर यांची यशस्वी वाटचाल; सेंद्रियता, नवोपक्रम आणि नफा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2025 16:23 IST

Farmer Success Story : परंपरागत शेतीच्या चौकटी मोडून, नवे प्रयोग करत शेतीतून आर्थिक उन्नती साधणारे शेतकरी म्हणजे उमरी तालुक्यातील हुंडा (उप) येथील श्रीधर शंकर गुंजकर. त्यांनी केवळ पारंपरिक पीकपद्धतीवर विसंबून न राहता कटुल्या, कारले, झेंडू, शेवगा यांसारख्या नगदी पिकांची सेंद्रिय पद्धतीने लागवड करत शाश्वत शेतीचे एक आदर्श उदाहरण राज्यातील शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे. (Farmer Success Story)

बी.व्ही. चव्हाण

परंपरागत शेतीच्या चौकटी मोडून, नवे प्रयोग करत शेतीतून आर्थिक उन्नती साधणारे शेतकरी म्हणजे उमरी तालुक्यातील हुंडा (उप) येथील श्रीधर शंकर गुंजकर. (Farmer Success Story)

त्यांनी केवळ पारंपरिक पीकपद्धतीवर विसंबून न राहता कटुल्या, कारले, झेंडू, शेवगा यांसारख्या नगदी पिकांची सेंद्रिय पद्धतीने लागवड करत शाश्वत शेतीचे एक आदर्श उदाहरण राज्यातील शेतकऱ्यांसमोर ठेवले आहे.(Farmer Success Story)

शेतीत नवा दृष्टिकोन

गुंजकर कुटुंबाने पारंपरिक शेतीच्या पलीकडे जाऊन विविधतेचा आणि नवकल्पनांचा अवलंब केला आहे. त्यांच्या ३२ एकर शेतात सोयाबीन, तूर, कापूस यांसारख्या पारंपरिक पिकांसह कारले, दोडका, शेवगा, वांगी, गाजर, पेरू, लिंबू, रामफळ आणि झेंडू अशा हिवाळी व उन्हाळी नगदी पिकांचीही यशस्वी लागवड केली जाते.

शेडनेट शेतीचा प्रभाव

गुंजकर यांनी शेडनेटमध्ये पिके घेण्याची पद्धत अवलंबून, कारले व दोडक्याचे अधिक उत्पादन घेतले आहे. यामुळे कीटकनाशक वापर कमी झाला असून, उत्पादनाची गुणवत्ता सुधारली आहे.

कर्दुला (कटुल्या) पासून मिळणारा फायदा

आज अल्प क्षेत्रातही जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून श्रीधर गुंजकर यांनी कटुल्याची निवड केली. स्थानिक बाजारात या पिकास अधिक मागणी असून, याच्या उत्पादनातून त्यांना दरवर्षी लाखोंचा फायदा होतो.

पशुपालन व सेंद्रिय शेती

त्यांच्याकडे असलेल्या १४ पशुधनांमुळे सेंद्रिय खतांची उपलब्धता असून, ते जीवामृत, गोमूत्र आणि कंपोस्ट यांचा वापर करून रासायनिक खतांपासून दूर राहतात. 

यामुळे त्यांच्या जमिनीची सुपीकता वाढत असून उत्पादनही दर्जेदार आहे.

कुटुंबाची एकत्र मेहनत 

श्रीधर गुंजकर यांच्या शेतीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कुटुंबातील सहा सदस्य स्वतः शेतात काम करतात. त्यामुळे मजुरीचा खर्च वाचतो आणि शेतीत नफा वाढतो.

शेडनेट व व्यवस्थापन कौशल्य

गुंजकर यांनी शेडनेटद्वारे भाजीपाला उत्पादनावर भर दिला आहे. यामध्ये नियंत्रित तापमान, नमी, पाणी व्यवस्थापन आणि कीड नियंत्रणाचे योग्य उपाय यांचं कौशल्य आहे. त्यांनी तणनियंत्रणासाठी मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन आणि सौर ऊर्जेचा वापर यासारखी आधुनिक तंत्रं आत्मसात केली आहेत.

कृषी अधिकाऱ्यांकडून गौरव

त्यांच्या या पुढारलेल्या शेती पद्धतीची जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी त्यांच्या शेताला भेट देत प्रशंसा केली. हे शेती मॉडेल इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Farmer Success Story : ७० गुंठ्यांची शेती, पण उत्पन्न एकरी २.५ लाखाचे उत्पन्न; जाणून घ्या कसे?

टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीशेतकरी यशोगाथाभाज्याफळेसेंद्रिय शेती