Join us
Daily Top 2Weekly Top 5

Farmer Success Story : माळरानातून लाखोंची कमाई;'ही' शेतीची स्मार्ट आयडिया वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 16:36 IST

Farmer Success Story : कोरडं आणि उजाड मानलं जाणारं माळरानही योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सोनं करू शकतं, हे धारूरच्या एका तरुण शेतकऱ्याने सिद्ध केलं आहे. अवघ्या काही वर्षांत त्यांनी फळशेतीतून २५ लाखांपर्यंत उत्पन्न मिळवून शेतीला नवा आयाम दिला आहे.(Farmer Success Story)

अनिल महाजन

डोंगरांनी वेढलेला, कोरडवाहू आणि पूर्वी उजाड मानला जाणारा घागरवडा रस्त्यालगतचा परिसर आज हिरवाईने नटलेला दिसतो. (Farmer Success Story)

या परिवर्तनामागे आहे एका तरुण शेतकऱ्याची जिद्द, नियोजन आणि आधुनिक शेतीचा वापर. शेतकरी सचिन जाधव यांनी अवघ्या सहा वर्षांत ओसाड माळरानाला फळबागेत रूपांतरित करत दरवर्षी तब्बल २५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवून दाखवले आहे.(Farmer Success Story)

सुरुवात संकटातून, पण विचार सकारात्मक

कोरोनाच्या कठीण काळात अनेकजण अडचणीत असताना, सचिन जाधव यांनी त्या काळाला संधी मानली. 

“जमीन आहे, पण पाणी कमी… तरी काहीतरी वेगळं करायचं,” या विचारातून त्यांनी फळशेतीचा मार्ग निवडला. 

कुटुंबाचा पाठिंबा आणि कृषी तज्ज्ञ डॉ. बी. बी. ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नियोजनबद्ध काम सुरू केले.

दहा एकरांत उभी फळबाग

जाधव यांनी सुमारे साडे दहा एकर क्षेत्रात विविध फळांची लागवड केली

आंबा (५.५ एकर): केशर, हापूस, रत्ना, तोतापुरी, बेनिसान, अंब्रपाली ३,००० झाडे

गोल्डन सिताफळ (३.५ एकर): २,२०० झाडे

उत्पादनाचे विविधीकरण केल्यामुळे जोखीम कमी झाली आणि वर्षभर उत्पन्नाचा मार्ग खुला झाला.

ठिबक सिंचनातून पाण्याची बचत

डोंगराळ भागात पाण्याची टंचाई मोठे आव्हान असताना, जाधव यांनी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला.

कमी पाण्यात अधिक उत्पादन मिळवण्यासाठी त्यांनी मातीचा दर्जा आणि हवामानाचा अभ्यास केला.

झाडांची वैज्ञानिक पद्धतीने निगा

वाऱ्याच्या वेगानुसार संरक्षण यावर विशेष भर दिला.

मेहनतीचे गोड फळ

या सर्व प्रयत्नांमुळे आज जाधव यांना दरवर्षी २० ते २५ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. त्यांच्या बागेतील फळांना धारूर, लातूर आणि पुणे बाजारपेठेत चांगली मागणी आहे. गुणवत्तेमुळे व्यापाऱ्यांकडूनही उत्तम दर मिळतो.

ओसाड जमिनीतून हिरवागार परिसर

पूर्वी कोरडा, ओसाड आणि निष्प्रभ दिसणारा हा परिसर आज उन्हाळ्यातही हिरवागार दिसतो. फळबागेमुळे केवळ उत्पन्न वाढले नाही, तर पर्यावरणालाही सकारात्मक बदल मिळाला.

डोंगराळ जमीन वाया जाऊ नये म्हणून काहीतरी वेगळं करण्याचा विचार केला. सुरुवातीला अडचणी आल्या, पण कुटुंबाचा आधार आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन यामुळे यश मिळालं. आधुनिक शेतीकडे वळा, प्रयोग करण्याची भीती बाळगू नका.- सचिन जाधव, शेतकरी

इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा

जाधव यांची ही यशोगाथा केवळ आर्थिक प्रगतीची नाही, तर नवोपक्रम, शाश्वत शेती आणि जिद्दीची कहाणी आहे. योग्य नियोजन, तंत्रज्ञानाचा वापर आणि सातत्यपूर्ण मेहनत यामुळे कोरडवाहू भागातही भरघोस उत्पन्न मिळू शकते, हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.

उजाड माळरानावर उभी राहिलेली ही फळबाग आज अनेक शेतकऱ्यांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. बदलत्या काळात शेतीत नवकल्पना आणि तंत्रज्ञानाचा स्वीकार केल्यास शेतीही फायदेशीर व्यवसाय बनू शकते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे सचिन जाधव यांची ही यशोगाथा.

हे ही वाचा सविस्तर :AI Farming : ऊस शेती होणार 'स्मार्ट'; या जिल्ह्यात 'सुपर ५० एआय फार्मर्स' प्रकल्प सुरू

अधिक वाचा : Coconut Farming Success Story : वसमतच्या मातीत 'बंगळुरू पॅटर्न'! नारळ-आंबा शेतीतून मनोज इंगोले यांची यशोगाथा

English
हिंदी सारांश
Web Title : Barren Land to Lakhs: Farmer's Smart Farming Idea Success Story

Web Summary : Sachin Jadhav transformed barren land into a thriving orchard in six years. Through innovative farming techniques and drip irrigation, he earns ₹25 lakhs annually from mangoes and custard apples. His success inspires farmers to embrace modern agriculture for higher yields and environmental benefits.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीफळेआंबा