lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > Success Story : पतीच्या साथीनं उभारली डाळ मिल, स्पीडने धावतंय संसार रथाचं व्हील!

Success Story : पतीच्या साथीनं उभारली डाळ मिल, स्पीडने धावतंय संसार रथाचं व्हील!

Latest News Dalmeel industry as a joint venture of women farmers in Washim district | Success Story : पतीच्या साथीनं उभारली डाळ मिल, स्पीडने धावतंय संसार रथाचं व्हील!

Success Story : पतीच्या साथीनं उभारली डाळ मिल, स्पीडने धावतंय संसार रथाचं व्हील!

शेतात मेहनत करून महिला शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून गावातच दालमील हा उद्योग सुरू केला आहे.

शेतात मेहनत करून महिला शेतकऱ्याने शेतीला जोडधंदा म्हणून गावातच दालमील हा उद्योग सुरू केला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

वाशीम : पुरुषांच्या तुलनेत कोणतेही काम करायला आता महिला सुद्धा मागे नाहीत. अनेक युवती, महिला विविध क्षेत्रात आपल्या कामाचा ठसा उमटवत आहेत. त्यात शेतीत राबणाऱ्या महिलांचे प्रमाण जास्त आहे. वाशीम जिल्ह्यातील बेलोरा येथील महिला शेतकरी निता मुंगशीराम उपाध्ये यांनी आपल्या पतीच्या साथीने आपल्या शेतात मेहनत करून त्यांनी बेलोरा गावी शेतीलाजोडधंदा म्हणून दालमील हा उद्योग सुरू केला आहे.

मानोरा परिसरातील सिमा उपाध्ये यांचे पती मुंगशीराम उपाध्ये हे प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे शेती कमी असल्याने फारसे उत्पादन होत नाही, कुटुंब चालविणे, मुलांचे शिक्षण, यासाठी पैसा कमी पडायचे. त्यामुळे त्यांचे पती मुंगशीराम उपाध्ये यांनी कृषी विभागाच्या मदतीने दालमीलसाठी प्रयत्न केले आणि त्यात यश मिळाले आणि शेतीला जोडधंदा म्हणून उत्पन्न वाढीची नवीन वाट शोधली आहे. आता या लघू व्यवसायातून बऱ्यापैकी मिळकत होते. त्याच बरोबर गहू साफ करण्याची मशीन सुद्धा आहे. त्यामुळे या व्यवसायाचा आम्हाला मोठा आधार झाल्याचे सिमा उपाध्ये यांनी सांगितले.

आता या डाळ मिलच्या माध्यमातून उपाध्ये यांना रोजगार मिळाला आहे. शिवाय गावातील नागरिक देखील आता उपाध्ये यांच्याकडे डाळ दळण्यासाठी येऊ लागले आहेत. पूर्वी बाजूच्या गावाला दळण घेऊन जावा लागत असे. मात्र आता गावातच ही सुविधा उपलब्ध झाल्याने ग्राहकांची संख्याही वाढली आहे. आता हळूहळू इतरही महिला कृषी विभागाच्या माध्यमातून इतर छोटा लघु उद्योग उभारण्यासाठी प्रयत्न करत असल्याने उपाध्ये यांनी सांगितले. या छोट्या उद्योगामुळे कुटुंबाला हातभार लागलाच शिवाय इतर महिलाना देखील छोटा मोठा उद्योग करण्याची प्रेरणा मिळाल्याचे त्यांनी सांगितले. 

महिलांसह इतरांसाठी हे एक आदर्श उदाहरण

अनियमित पाऊस, कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ आणि शेतमालाचे भाव कमी असणे. यामुळे शेती आता न परवडणारी झाल्याने अनेकांनी शेती सोडली. परंतु शेतीसोबत जोडधंदे निवडले, तर बेरोजगारी निर्माण होणार नाही. असे मत निता उपाध्ये यांनी व्यक्त केले. शेतीला जोडधंदा म्हणून अनेक उद्योग आहे सर्वांनी नवनवीन प्रयोग करून शेतीला जोडधंदा सुरू केला पाहिजे. जिद, चिकाटी व परिश्रमाच्या जोरावर एक महिला काय करू शकते, शिवाय शेतीला जोडधंदा कसा करावा, हे निता उपाध्ये यांनी दाखवून दिले.

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा...

Web Title: Latest News Dalmeel industry as a joint venture of women farmers in Washim district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.