Join us
Daily Top 2Weekly Top 5

Coconut Farming Success Story : वसमतच्या मातीत 'बंगळुरू पॅटर्न'! नारळ-आंबा शेतीतून मनोज इंगोले यांची यशोगाथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 10:51 IST

Coconut Farming Success Story : वसमतच्या मातीत एक भन्नाट प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पारंपरिक शेतीला बाजूला ठेवत कुरुंदा येथील प्रगतिशील शेतकरी मनोज इंगोले यांनी बंगळुरू पॅटर्नवर आधारित नारळ आणि आंबा फळबाग उभी केली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या ३.५ वर्षांत नारळाला फुलोरा आणि २ वर्षांत आंब्याला फळधारणा सुरू झाल्याने या मॉडेलकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे.वाचा सविस्तर यशकथा…(Coconut Farming Success Story)

इस्माईल जहागीरदार

परंपरागत पिकांच्या चौकटीबाहेर जाऊन नवे प्रयोग करण्याची हिंमत दाखवणारे शेतकरीचशेतीला नवी दिशा देतात. (Coconut Farming Success Story)

अशीच प्रेरणादायी यशकथा आहे कुरुंदा येथील प्रगतिशील शेतकरी मनोज साहेबराव इंगोले यांची. त्यांनी कर्नाटकच्या 'बंगळुरू पॅटर्न'वर आधारित नारळ आणि आंबा फळबागेचा यशस्वी प्रयोग आपल्या ६ एकर शेतात उभा केला आहे.(Coconut Farming Success Story)

प्रयोगाची सुरुवात: शिकून केलेली शेती

मनोज इंगोले यांनी थेट बंगळुरू येथे जाऊन तेथील आधुनिक नारळ शेतीचे तंत्र समजून घेतले. माती, हवामान आणि पाण्याच्या उपलब्धतेचा अभ्यास करून त्यांनी हा मॉडेल वसमतमध्ये आणण्याचा निर्णय घेतला.

६ एकर शेताची निवड

सुमारे १,००० उच्च प्रतीची नारळाची रोपे बंगळुरूहून मागवली

१५–२० फूट अंतरावर शास्त्रोक्त लागवड

नियमित सिंचन (दर ८ दिवसांनी)

संतुलित खत व्यवस्थापन

या सर्व गोष्टींचे काटेकोर पालन केल्यामुळे अवघ्या ३.५ वर्षांत नारळाला फुलोरा (कणसे) येऊ लागला. जो या भागासाठी मोठा टप्पा मानला जातो.

आंतरपीक मॉडेल: नारळासोबत आंब्याची जोड

फक्त एकाच पिकावर अवलंबून न राहता मनोज यांनी स्मार्ट पद्धत वापरली. 

आंतरपीक (Intercropping) ८६५ आंब्याची रोपे (केशर व दशहरी)

अवघ्या २ वर्षांत फळधारणा सुरू

सुरुवातीपासूनच रोख प्रवाह (cash flow) मिळू लागला

यामुळे नारळाची झाडे मोठी होईपर्यंत आंब्यापासून उत्पन्न मिळण्याची सोय झाली.

व्यवस्थापनाचे गुपित

या यशामागे काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत.

* मातीचा आधी अभ्यास

* पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन

* योग्य अंतरावर लागवड

* वेळेवर खत आणि निगा

* तांत्रिक माहिती प्रत्यक्ष शेतातून मिळवणे

भविष्यातील उत्पन्नाची मोठी आशा

नारळ आणि आंबा या दोन्ही फळबागा एकत्र आल्यामुळे दीर्घकालीन स्थिर उत्पन्न मिळाले.

बाजारात चांगली मागणी

कमी जोखमीची शेती

मी बंगळुरूहून रोपे आणून जिद्दीने ही बाग फुलवली. साडेतीन वर्षांत नारळाला फुलोरा आल्याने समाधान आहे. भविष्यात यातून चांगले उत्पन्न मिळेल.- मनोज इंगोले, शेतकरी

अनुदानासाठी अडथळे; शेतकऱ्यांची नाराजी

या यशोगाथेमागे मेहनत जितकी आहे, तितक्याच अडचणीही आहेत.

शासकीय अनुदान मिळण्यात विलंब

कागदपत्रांसाठी वारंवार चकरा

तांत्रिक मार्गदर्शनाची कमतरता

मनोज इंगोले यांची मागणी काय आहे.

वेळेवर अनुदान

कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शन

फळबाग प्रकल्पांसाठी सुलभ प्रक्रिया

इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा

वसमत परिसरात हा प्रयोग आता चर्चेचा विषय ठरला आहे. कमी पाण्यात आणि योग्य नियोजनात फळबाग शेती हा उत्तम पर्याय ठरू शकतो, हे या प्रयोगातून दिसून येते.

हे ही वाचा सविस्तर : Success Story : मातीशी नातं… आणि यशाशी मैत्री; शेतकरी मुलाची प्रेरणादायी कहाणी वाचा सविस्तर

अधिक वाचा : Aaple Sarkar Kendra : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 'आपले सरकार' केंद्रांवर पारदर्शकता; नवा नियम लागू

English
हिंदी सारांश
Web Title : Coconut-Mango Farming Success: Vasant's Soil Sees 'Bangalore Pattern' Triumph!

Web Summary : Farmer Manoj Ingole adopted the 'Bangalore Pattern' in Vasmat, cultivating coconut and mangoes on six acres. He achieved early flowering in coconuts and fruit yields from intercropped mangoes, ensuring steady income and inspiring local farmers with innovative techniques.
टॅग्स :शेती क्षेत्रशेतकरीशेतीआंबापीक