lokmat Supervote 2024
Lokmat Agro >लै भारी > Success Story : दोन एकरांत चार लाखांचं वार्षिक उत्पन्न, शेतकऱ्याने फळशेतीतून साधली किमया 

Success Story : दोन एकरांत चार लाखांचं वार्षिक उत्पन्न, शेतकऱ्याने फळशेतीतून साधली किमया 

Latest News Annual income of four lakhs in two acres, gadchiroli farmers story | Success Story : दोन एकरांत चार लाखांचं वार्षिक उत्पन्न, शेतकऱ्याने फळशेतीतून साधली किमया 

Success Story : दोन एकरांत चार लाखांचं वार्षिक उत्पन्न, शेतकऱ्याने फळशेतीतून साधली किमया 

गडचिरोली एका शेतकऱ्याने प्रत्यक्षात पारंपरिक शेती नफ्यात आणून दाखवली आहे.

गडचिरोली एका शेतकऱ्याने प्रत्यक्षात पारंपरिक शेती नफ्यात आणून दाखवली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

गडचिरोली : स्वतःच्या मालकीच्या दोन एकर शेतीत 20 आंब्यांची झाडे, एका वर्षात एक लाख रुपयांचे उत्पादन, एका फणसाच्या झाडापासून 20 हजार रुपयांची फळविक्री, अर्धा एकरातील मक्यापासून सव्वा लाख रुपये तर अर्धा एकरातील कारले पिकापासून वर्षाकाठी एका लाखाचे उत्पादन मिळते. ही काही कोण्या चित्रपटातील गोष्ट नाही तर सोनेरांगीच्या एका शेतकऱ्याने प्रत्यक्षात पारंपरिक शेती नफ्यात आणून दाखवली आहे. या शेतकऱ्याची मेहनत खरोखरच आर्थिकदृष्ट्या फळाला आली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या कढोलीजवळील सोनेरांगीतील शेतकरी लोमेश कोटांगले यांनी फळबाग व भाजीपाला शेतीतून नफा कमवला आहे. कोटांगले यांची शेती कढोली- जांभळी मार्गालगत आहे. येथे दोन एकर धानाची शेती होती; पण ती आता बागायती केल्याने लागवड खर्च कमी, श्रम कमी, कमी सिंचनात दोन एकरात चार लाखांचे वार्षिक उत्पादन लोमेश कोटांगले घेत आहेत. 

शासनाकडून फळबाग, सिंचन, शेती, यंत्रे, कीटकनाशके, बी-बियाणे सवलतीत मिळतात. त्याचा लाभ अनेक शेतकऱ्यांनी घेऊन शेतात नवे प्रयोग केले आहेत. या माध्यमातून त्यांना आर्थिक लाभ मिळत आहे. काही शेतकरी नवीन प्रयोग करत आहेत. आपल्या शेतमालाला भाव मिळत नाही, अशी ओरड न करता, ज्या शेतमालाला अधिक भाव मिळतो, तीच पिके घेतल्यास आर्थिक सुबत्ता हमखास मिळते, असे शेतकरी कोटांगले सांगतात.


शेतात आंब्यांची २० झाडे

कोटांगले यांच्या शेतात दशेरी, लंगडा, पायरी अशी चांगल्या प्रजातीची २० आंब्याची झाडे आहेत. ही आंब्याची झाडे कोणत्याही लागवड खर्चाशिवाय वर्षाकाठी १ लाखांचे उत्पादन देतात. एकदा आंबा, फणस लावले की, बँकेत गुंतवलेल्या पैशाला जसे व्याज मिळते, तसा पैसा फळबागेतून मिळतो. फक्त गरज असते ती नियोजनाची. नियोजनाचा हाच मंत्र कोटांगले यांनी उपयोगात आणला आहे.

धानाभोवती पिंगा सुटणार केव्हा?

जिल्ह्यातील ८० टक्के खरीप हंगाम धान पीक लावगडीखाली असतो. जिल्ह्यात फळवर्गीय पिकांसाठी पोषक वातावरण असतानाही शेतकऱ्यांचा धान पिकाभोवती पिंगा सुरू आहे. नफ्याची शेती कसायची असेल तर व्यावसायिक शेतीवर भर देणे गरजेचे आहे.

धानपट्टयात 'धान एके धान, धान दुणे धान' ही स्थिती आहे आणि नापिकी आली की, सरकारच्या विरोधात ओरडणे हा एकमेव मार्ग काही शेतकऱ्यांनी शोधला आहे. शेतकरी नवीन पर्याय शोधत नसल्यामुळे व नवीन प्रयोगांचा अभाव असल्यामुळे आमच्याकडील पाच एकर शेती असलेला शेतकरीसुद्धा आर्थिकदृष्ट्या आजही सक्षम नाही.

- लोमेश कोटांगले, शेतकरी, सोनेरांगी

पीक व्यवस्थापनापासून नियोजनापर्यंत, शेतीच्या सर्व अपडेट्ससाठी लोकमत ऍग्रोच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील व्हा..

Web Title: Latest News Annual income of four lakhs in two acres, gadchiroli farmers story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.