करमाळा : शेवग्याच्या शेंगा विकून मालामाल होणारे शेतकरी आपण पाहिलेले आहेत. परंतु शेवगा शेतीतून पाला व त्यापासून पावडर तयार करून थेट अमेरिकेत निर्यात करण्याचा या शेतकऱ्याने केला विक्रम.
करमाळा तालुक्यातील साडे येथील युवा शेतकरी महादेव मोरे यांनी शेवग्याची हटके अशी शेती करत शेवग्याच्या पाल्यापासून लाखोचे उत्पन्न घेतले आहे.
महादेव ह्या शेतकऱ्याने तब्बल साडेसात एकरावर शेवगा शेती केली आहे. शेवग्याच्या पाल्यापासून पावडर करून ते हवाबंद ड्रममध्ये पंचवीस किलोप्रमाणे भरून अमेरिकेला पाठवत आहेत. त्यातून त्यांनी लाखो रुपये कमावलेले आहेत.
सुरुवातीस दुष्काळामध्ये एक एकर शेवग्याची शेती मोरेंनी केली होती. कोरोनामध्ये शेवग्याची शेती नुकसानीत गेली. त्यातून झालेला खर्चसुद्धा निघाला नाही. त्यानंतर शेवग्याच्या शेंगा न विकता शेवग्याचा पालाची पावडर करून विक्री करायचा निर्णय त्यांनी घेतला.
शेवग्याच्या शेंगा चर्चेत असल्या तरी शेवग्याचा पाला कधीही चर्चेत नव्हता. पण त्याची पावडर करून विकण्याची कल्पना त्यांना गुजरातमधील शेवगा शेती यूट्यूबवर पाहिल्यानंतर सुचली.
सुरुवातीला एक ते दीड एकरात शेवगा पाल्याच्या पावडरचा प्रयोग केला. देशात कोलकाता, हैदराबाद, नागपूर, मुंबई व पुणे येथे पात किलोपासून दोन किलोपर्यंत शेवगा पाल्याची पावडर विक्री केली. त्यात यश आले.
शेवगा पाला पावडर उत्पादन एकरी चार ते पाच टन पहिल्या वर्षी निघाले. सदर प्लॉट आठ ते दहा वर्षे चालतो. आठ दिवसांपासून एकदा पाणी द्यावे लागते. ५० हजारांपर्यंत खर्च होतो. चार ते पाच लाखांचे उत्पन्न मिळाले.
बी. पी. शुगरसह तीनशे आजारांवर गुणकारीशेवगा हा शुगर, बी. पी. सह तीनशे प्लस आजारावर गुणकारी औषध आहे. मूतखडा व मूळव्याध हे दोन रोग वगळले तर सर्व रोगावर शेवगा गुणकारी आहे. शेवगा पाला पावडर (मुरिंगा पावडर) औषधासाठी उपयोगात आणला जात आहे.
कुठल्याही प्रकारचे रासायनिक खत न वापरता गांडूळ खत व शेणखत त्याशिवाय शेवग्याच्या पाल्यापासून तयार झालेली लिक्विड म्हणून द्यावी लागते. शेवग्यावर रोगराई नसल्याने फवारणी करण्याची गरज नाही. एका एकरासाठी सुमारे ५० हजारांपर्यंत खर्च होतो. यातून चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. - महादेव मोरे, युवा शेतकरी
अधिक वाचा: Shevga Powder : शेवग्यापासून कशी बनवाल पावडर? उद्योग उभारणीसाठी किती लागतो खर्च; पाहूया सविस्तर